लातूर येथील मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यात पहिल्या रेल कोच शेलचे (सांगाड्याचे) उत्पादन सुरू

Image may contain: outdoor

लातूर, 26 डिसेंबर 2020

कोविड-19 संबंधित लॉकडाऊन व आव्हाने असूनही भारतीय रेल्वेच्या रेल्वे विकास निगम मर्यादित (आरव्हीएनएल) या सार्वजनिक उपक्रमाने 25 डिसेंबर 2020 रोजी, सुशासन दिनाच्या दिवशी, महाराष्ट्रातील लातूरमधील मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यात पहिल्या रेल कोच शेलचे (सांगाड्याचे) उत्पादन झाल्याची घोषणा केली. दोन वर्षांपूर्वी हा कारखाना सुरू झाला आहे.

Image may contain: sky and outdoor

मराठवाडा रेल कोच फॅक्टरी आधुनिक औद्योगिक व्यवस्थेच्या माध्यमातून  महाराष्ट्राच्या या महत्वाकांक्षी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. दरवर्षी 250 एमईएमयू / ईएमयू / एलएचबी / ट्रेन सेट प्रकारचे आधुनिक कोच तयार करण्याच्या प्रारंभिक क्षमतेसह या कारखान्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. रेखांकन योजनेत भविष्यातील बदलांसाठी पुरेसा वाव असल्याने या क्षमतेत लक्षणीय वाढ होऊ शकते. या प्रकल्पावर करण्यात आलेला खर्च 500 कोटी रुपये असून जमिनीची किंमत 120 कोटी रुपये आहे.

Image may contain: sky and outdoor

हा कारखाना 350 एकर जागेवर उभारला असून यामध्ये 52,000 चौरस मीटर अभियांत्रिकी पुर्व कार्याची इमारत शेड, तीन लाईन यार्ड, 33 केव्ही  विद्युत सबस्टेशन, कॅन्टीन, सुरक्षा व प्रशासकीय विभाग आणि 24 एकरात निवासी वसाहती आहेत. कारखान्यातून नवीन इलेक्ट्रिकली इंटरलॉक्ड हरंगुल रेल्वे स्थानकात कोच हलविण्यासाठी 5 किमी लांबीची रेल्वे मार्ग जोडणी देण्यात आली आहे. कारखाना अत्याधुनिक यंत्रणा आणि यंत्रसंच, माल हाताळण्याची व्यवस्था  आणि विविध उपयुक्त सुविधांनी सुसज्ज आहे.

Image may contain: 2 people, people sitting

शाश्वत विकासासाठी प्रकल्पात विविध हरित उपक्रम राबविले आहेत ज्यात 800 किलो वॅट क्षमतेचे छतावरील सौर उर्जा प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन आणि पुनर्वापर प्रकल्प, पावसाचे पाणी साठवण, 10,000 वृक्ष लागवड, एलईडी लाइटिंग, नैसर्गिक प्रकाश आणि व्हेंटीलेशन यांचा समावेश आहे.  प्रशासकीय ब्लॉक देखील हरित इमारत संकल्पनुसार बांधला  आहे.

Image may contain: 10 people, people standing

28 ऑगस्ट 2018 रोजी हा प्रकल्प मंजूर होताच, रेल्वे मंत्रालयाच्या मिनी-रत्ना पीएसयू रेल विकास निगम लिमिटेडने 30 ऑगस्ट 2018 रोजी आपल्या जलद मार्गावरील टर्न-की अंमलबजावणीसाठी संयुक्त कंत्राट दिले आणि 12 ऑक्टोबर 2018 रोजी कामाला सुरुवात झाली. नजीकच्या काळात हा कारखाना अजून रेल्वे कोच सांगाडे तयार करेल अशी अपेक्षा आहे.