देवगिरी अभियांत्रिकी महाविदयालयातर्फे “MHT-CET 2020 साठी अंतिम महिन्यातील परीक्षेची तयारी कशी करावी” याबददल ऑनलाईन मार्गदर्शन

औरंगाबाद,४जून : 

१२वीसायन्सच्या विद्यार्थ्यांच्या  MHT-CET 2020 साठी एक महिन्याचा कालावधी राहिला आहे, परंतू सद्दस्थितीत कोविड -१९च्या महामारीमुळे  विदयार्थी हे महाविदयालये, कोचिंग क्लासेस अशा ठिकाणी परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी जाऊ  शकत नाहीत व त्यामुळे विद्यार्थ्यांवर 

 दडपण येत आहे़.

MHT CET – 2020 – exam 360

या सर्व बाबी लक्षात घेऊन  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविदयालयातर्फे MHT-CET 2020 ला बसणा-यासाठी ”अंतिम महिन्यातील परिक्षेची तयारी कशी करावी?” याबददल ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येणार आहे यासाठी  MHT-CET परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम व व्दितीय आलेले व सध्या कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे येथे शिक्षण घेत असलेले आदित्य अभंग (PCM-१९५) 

अमेय झरकर (PCM-१९१) हे ६जून रोजी सकाळी ११ वाजता विदयार्थी व पालकांसोबत YouTube च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत, तसेच या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या  मनातील परीक्षेसंबंधीच्या विविध प्रश्नांची उत्त्तरेही देणार आहेत़ यामुळे विदयाथ्र्यांना CET परीक्षेसंदर्भात अंत्यत  मोलाची माहिती मिळणार आहे़.

या कार्यक्रमांची  You Tube लिंक  https://tinyurl.com/cet-webinar                                                            

            या संधीचा सर्व विदयार्थी व पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाविदयालयाचे संचालक डॉ़ उल्हास शिउरकर, उपप्राचार्य प्रा़ संजय कल्याणकर प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ़ सत्यवान धोंडगे व प्रा़ सुजीत चौधरी यांनी केले आहे़.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *