इंग्लंडहून राज्यात आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण,१६ प्रवासी कोरोनाबाधित

मुंबई, दि. २६ :इंग्लंडमध्ये जनुकीय बदल झालेला कोरोना विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबरनंतर इंग्लंडहून राज्यात आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.आजपर्यंत ११२२ प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचणीत १६ प्रवासी कोरोनाबाधित आढळले आहेत.जनुकीय रचना शोधण्यासाठी रुग्णांचे नमुने पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठविले.

 बाधित रुग्णांमध्ये नागपूर ४, मुंबई व ठाणे प्रत्येकी ३, पुणे २ आणि नांदेड, अहमदनगर, औरंगाबाद व रायगड येथील प्रत्येकी १ रुग्ण आहेत . बाधित रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध सुरू आहे. आजवर शोधण्यात आलेल्या ७२ निकट सहवासितांपैकी २ निकट सहवासित कोरोना बाधित आढळले आहेत.