जालना जिल्ह्यात सरासरी 11.09 मि.मी. पावसाची नोंद
जालना, दि. 4 :- जिल्ह्यात दि. 4 जून 2020 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 11.09 मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे. जालना-6.38 (33.51 ), बदनापूर- 12.00 (36.80 ),भोकरदन- 21.63 (30.14 ),जाफ्राबाद-33.80 (47.00), परतूर- 1.80 (25.60 ), मंठा-00 (29.75 ), अंबड-7.71 (37.71) घनसावंगी- 5.43 (36.86) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण 23.58 मि.मी. एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.
