औरंगाबाद जिल्ह्यात 89 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 43552 कोरोनामुक्त, 541 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 25 :औरंगाबाद जिल्ह्यात आज 101 जणांना (मनपा 91, ग्रामीण 10) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 43552 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 89 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 45289 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1196 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 541 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (76)सातारा परिसर (2), चंद्रगुप्त नगर (2), एन सात (1), कॅनॉट प्लेस (1), समर्थ नगर (1),बीड बायपास (5), एन वन (1), कासलीवाल पुरम (1), हायकोर्ट कॉलनी (1), त्रिमूर्ती चौक (1), जालान नगर (3), मनपा परिसर (1), एन दोन (2), राज नगर (1), पगारिया कॉलनी (1), खोकडपुरा (1), चिखलठाना (2), हॉटेल जिंजर परिसर (1), अयोध्या नगर (1), शिवेश्वर कॉलनी (1), नवयुग कॉलनी(1), एन सहा (1), एसबीआय बँक मुख्यालय परिसर (4), विमानतळ परिसर (3), उत्तम नगर जवाहर कॉलनी (1), एन तीन सिडको(1), पुष्पनगरी , समर्थ नगर (1), टाऊन सेंटर सिडको(1), अन्य (33)

ग्रामीण (13)बजाज नगर (1), तिसगाव (1), लांझी, गंगापूर (1), अन्य (10)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत एन सात सिडकोतील 65 वर्षीय पुरुष आणि खासगी रुग्णालयात नागेश्वरवाडीतील 81 वर्षीय पुरुष व भावसिंगपुरा येथील 77 वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.