पंतप्रधानांकडून अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त आदरांजली

नवी दिल्ली ,२५डिसेंबर :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना, त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.

“माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना, त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः प्रणाम. आपल्या दूरदर्शी नेतृत्वाने त्यांनी देशाचा विकास अभूतपूर्व उंचीवर नेला. सशक्त आणि समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न सदैव स्मरणात राहतील. “, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

अटलबिहारी वाजपेयींना नमन

केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीना आज त्यांच्या जयंतीदिनी  नवी दिल्ली येथील स्मारकावर जाउन आदरांजली वाहिली.

Image

केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की, परम आदरणीय भारतरत्न अटलजी यांच्या जयंतीनिमित्त ‘सदैव अटल’ या त्यांच्या स्मृतिस्थळी पुष्पांजली अर्पण केली. अटलजीचे विचार आणि देशाच्या विकासाप्रति त्यांचे समर्पण यामुळे आपणास सदैव देशसेवेची प्रेरणा मिळत राहील.

Image

अमित शहा पुढे म्हणाले, “परम आदरणीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना नमन.  त्यांनी विकासाचे  तसेच गरीब कल्याण व भारतातील उत्तम प्रशासन युग सुरू केले. देशासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. अटलजींची कर्तव्यनिष्ठा आणि देशसेवा आपल्याला सदैव  प्रेरणा देत राहील. कामाप्रती निष्ठा आणि देशसेवा आपल्याला नेहमीच ध्येयप्राप्तीसाठी प्रेरित करतात.”