औरंगाबाद जिल्ह्यात 92 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,दोन मृत्यू

जिल्ह्यात 43268 कोरोनामुक्त, 605 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 22 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 64 जणांना (मनपा 44, ग्रामीण 20) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 43268 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 92 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 45064 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1191 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 605 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (76)शरनापुर, मिटमिटा (3), सैनिक कॉलनी, पडेगाव (2), मयुरपार्क (1), जय भवानी नगर (1), गणेश नगर (3), एन-2 सिडको (2), मुकुंदवाडी (4), पुंडलिक नगर (4), म्हाडा कॉलनी (1), वानखेडेनगर (1), विध्या नगर, सेवन हिल (1), देवळाई रोड (1), ठाकरे नगर, एन-2 सिडको (3), एन-6 सिडको (3), नारेगाव, माणिक नगर (2), हर्सूल टी पॉईंट (1), सातारा परिसर (1), दिशा नगरी, बीड बाय पास (1), किराडपुरा (1), पदमपुरा (1), राजाबाजार (1), शेंद्रा एमआयडीसी (1), रेल्वे स्टेशन परिसर(2), अन्य (32), हनुमान नगर (1), कॅनॉट प्लेस (1), अभिमान सोसायटी (1),

ग्रामीण (16)चितेगाव (1), सिल्लोड (1), खुलताबाद (1), वडजी, डावरवाडी (1), अनय् (12)

दोन कोरोनाबाधिताचा मृत्यू

घाटीत भावसिंगपुरा येथील 73 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात भानुदास नगरातील 44 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.