सह्याद्रीचा अ . भा. कविता महोत्सव २५ व २६ डिसेंबरला ऑनलाईन

भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी,अध्यक्षपदी कवी, चित्रकार व अनुवादक गणेश विसपुते 

औरंगाबाद- येथील सह्याद्री साहित्य कला व सांस्कृतिक प्रतिष्ठान, औरंगाबाद यांच्यावतीने दिनांक २५ व २६ डिसेंबर २०२० रोजी ‘अखिल भारतीय कविता महोत्सव २०२०’ आयोजित केला आहे. दरवर्षी ऑफलाईन होणारा हा महोत्सव यावर्षी कोरोनामुळे  दोन दिवस ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. अशी माहिती निमंत्रक डॉ. कैलास अंभुरे व डॉ. रमेश रावळकर यांनी दिली.

कवी, चित्रकार व अनुवादक गणेश विसपुते

केवळ कवितेला वाहिलेल्या या महोत्सवाच्या अध्यक्षपदी मराठीतील नामवंत कवी, चित्रकार व अनुवादक गणेश विसपुते असून, सायं.ठीक ५ वा. मुंबई येथील ज्येष्ठ हिंदी कवी, निबंधकार व अनुवादक विजयकुमार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल.यावेळी उपजिल्हाधिकारी भारतकुमार कदम (औरंगाबाद) ,डॉ . दादा गोरे (औरंगाबाद) व कवी, समीक्षक  डॉ. पी . विठ्ठल (नांदेड)यांची उपस्थिती राहणार आहे.

ज्येष्ठ हिंदी कवी, निबंधकार व अनुवादक विजयकुमार

 दुसऱ्या सत्राची सुरुवात सायं. ६ वा. होईल. यात केरळच्या ज्येष्ठ कवयित्री डॉ. रती सक्सेना यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे. ही मुलाखत डॉ . पृथ्वीराज तौर (नांदेड) व झमरुदा मुहंमद मीर (काश्मीर) हे घेतील.

दुसऱ्या दिवशी सायं. ठीक ५ वा. तिसरे सत्र होईल .यात ‘समकालीन भारतीय कविता’ या विषयावर गणेश कनाटे (मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. यामध्ये अनिल करमेले (भोपाळ) व सरबजित गरचा (दिल्ली) वक्ते म्हणून सहभागी होतील.

चौथ्या सत्रात ६ वा.

मुंबई येथील प्रसिद्ध कवयित्री मीनाक्षी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे कविसंमेलन होणार आहे.

यामध्ये तरन्नुम रियाज (दिल्ली), शिल्पा गडमडे- मुळे (जर्मनी), कपूर वासनिक (छत्तीसगड), नीरज दइया (राजस्थान), गणेश ठाकूर (जमशेदपूर), ओम प्रकाश (उत्तर प्रदेश), श्यामल गरुड (मुंबई), अशोक कोतवाल (जळगाव), रंणजित गोगोई (आसाम), एकनाथ पाटील (इस्लामपूर), हर्षदा सुंठणकर (बेळगाव), वीरू सोनकर (कानपूर), ऋषीराज जानी (अहमदाबाद),शेख इक्बाल मिन्ने( औरंगाबाद),विद्या सुर्वे-बोरसे (नाशिक), अनिल साबळे (जुन्नर) व ज्ञानेश्वर तिखे (इंदूर),हबीब भंडारे (औरंगाबाद)हे सर्व कवी सहभागी होणार आहेत.

उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन नाशिक येथील हिंदी भाषा अभ्यासक डॉ.विजयप्रसाद  अवस्थी करतील. मुलाखत सत्राची धुरा औरंगाबाद येथील आकाशवाणीमधील हिंदी व इंग्रजी भाषा अभ्यासक नम्रता फलके करतील. युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी व इंग्रजी भाषा अभ्यासक प्रा. रवी कोरडे हे मुलाखत सत्राचे संचालन करणार असून, नांदेड येथून डॉ.विश्वाधार देशमुख कविसंमेलनाचे सूत्र सांभाळणार आहेत.हा कविता महोत्सव झूम अॅपवरून यू ट्यूब व फेसबुकवर सुद्धा ऑनलाईन बघता येईल.

साहित्यप्रेमी, अभ्यासक व रसिकांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा.असे आवाहन प्रतिष्ठानचे डॉ. ललित अधाने, डॉ. शशिकांत पाटील, डॉ.अनिरुद्ध मोरे, गेणू शिंदे, प्रा.बालाजी भंडारे, गणेश घुले ,डॉ. समाधान इंगळे, रमेश रावळे, डॉ. संध्या मोहिते, नीरा देवकते, प्रा.रवी कोरडे, डॉ.प्राजक्ती भोसले डॉ.विजयप्रसाद  अवस्‍थी, डॉ. राजेश दांडगे, डॉ.वीरा राठोड, सीमा ढगे, विद्या कुलकर्णी, आशा डांगे, आशा मिसाळ  यांनी केले आहे.