Nanded Corona Update:29 कोरोना बाधितांची भर तर 35 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड दि. 21 :- सोमवार 21 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 29 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 24 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 4 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 35 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या 493 अहवालापैकी 454 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 89 एवढी झाली असून यातील 20 हजार 35 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 294 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 15 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 563 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 15, देगलूर कोविड रुग्णालय 3, हैद्राबाद येथे संदर्भीत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 2, कंधार तालुक्यांतर्गत 1, किनवट कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 8 असे एकूण 35 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 16, लोहा तालुक्यात 1, कंधार 1, नांदेड ग्रामीण 2, मुखेड 3, परभणी 1 असे एकुण 24 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 4, यवतमाळ 1 असे एकुण 5 बाधित आढळले.

जिल्ह्यात 294 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 25, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 17, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 21, मुखेड कोविड रुग्णालय 11, देगलूर कोविड रुग्णालय 17, हदगाव कोविड रुग्णालय 6, किनवट कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 149, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 28, औरंगाबाद येथे संदर्भीत 1, खाजगी रुग्णालय 17 आहेत.

सोमवार 21 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 164, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 69 एवढी आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 72 हजार 118,एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 46 हजार 996एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 89एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 35 एकुण मृत्यू संख्या-563उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-6आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-433रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-294आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-15.