राष्ट्रीय महामार्गावर 1 जानेवारी पासून ‘फास्टॅगची’ अंमलबजावणी

औरंगाबाद, दिनांक 18  : भारतातील सर्व राष्ट्रीय महामार्गावरील टोलवर फास्टॅग (FASTag) 1 जानेवारी 2021 पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे. औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातून जाणा-या रा.रा 52 वरील टोलनाक्यावर नगद टोल फीस बंद होऊन फास्टॅग यंत्रणेची अंमलबजावणी  होऊन फास्टॅग यंत्रणेची सक्ती करण्यात येणार आहे. तरी सर्व वाहन धारकांनी याची नोंद घ्यावी व शीघ्रतेने आपल्या वाहनांना 1 जानेवारी 2021 पूर्वी FASTag बसवून घेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अजय गाडेकर यांनी केले आहे.

1 जानेवारी 2021 नंतर रोख रक्कम मध्ये कोणतेही पेमेंट स्वीकार केले जाणार नाही.  उस्मानाबाद जिल्ह्यातील पारगाव, बीड जिल्ह्यातील पाडळसिंगी, जालना जिल्ह्यातील भोकरवाडी-माळेवाडी येथे FASTag तसेच Topup Recharge उपलब्ध आहेत. तसेच ॲक्सिस, आयसीआयसीआय, एचडीएफसी, एसबीआय, आयडीएफसी, पेटीम, कोटक महिंद्रा, सिंडीकेट, इंडसिंड, युनियन बँक येथे प्रत्यक्ष FASTag काढण्यासाठी केवळ 10 मिनिट लागत आहेत. FASTag चा उद्देश हा प्रवाशांसाठी सुलभ व तत्काळ Exit प्रणाली आहे. सुलभ देय, लांब रांगेतून सुटकारा, काही सेकंदातच RFID व्दारे FASTag ने ऑटोमॅटीक टोल फी घेऊन वाहनास विना विलंब पुढे जाता येणार आहे. रोख स्वरूपातील देयापासून मुक्ती मिळेल (सोबत कॅश बाळगण्याची गरज नाही), वेळेची होणारी बचत, डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यास मदत होणार आहे, My FASTag App (Google Play Store वरून) सुविधा उपलब्ध, इंधनाची बचत, मोबाईल बँकिंगव्दारे सुलभ, ऑनलाईन रिचार्ज, एसएमएस अलर्ट आदी FASTag ची वैशिष्ट्ये आहेत, असेही त्यांनी कळविले आहे.