जालना चार रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

जालना, दि. 3 – जालना जिल्ह्यामध्ये दि. 3 जुन रोजी कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आलेला नाही.तसेच नुतनवाडी ता. जालना येथील 17 वर्षीय कोरोनाबाधित महिला व 42 वर्षीय पुरुष, एस.आर.पी.एफ. जालना मधील एक 33 वर्षीय जवान व कानडी ता. मंठा येथील एक 23 वर्षीय महिला अशा एकुण चार रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांच्या दुस-या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण -2590 असुन सध्या रुग्णालयात 84 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती 1108, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या -111 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या 2922 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने – 00,असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -153 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 2694, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-364, एकुण प्रलंबित नमुने -71, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1022,14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 05,

No photo description available.

14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती – 915,आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-56, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -425, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत – 15, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 84,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-17, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-04, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या -56, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या- 94(+ एक रेफर औरंगाबाद), पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 5027 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 02 एवढी आहे.

कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 425 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-36, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-23, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -31, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-31, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -105 कस्तुरबा गांधी बालिका वसतीगृह परतुर -38, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-09, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-03 राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद-00 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -19, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-23, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे –36 अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी -08, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल इमारत क्र.2-02, मॉडेल स्कुल मंठा-35, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -26 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.

लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 741 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 147 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 807 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 3 लाख 10 हजार 230 असा एकुण 3 लाख 37 हजार 38 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *