वंचित बहुजन आघाडी तर्फे धरणे आंदोलन

औरंगाबाद, दिनांक 17 :आज  17 डिसेंबर 2020 रोजी वंचित बहुजन आघाडी तर्फे शेतकरी आंदोलन समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आंदोलन करण्यात आले. आंदोलन करत असतांना शेतकरी विरोधी निर्णय घेणाऱ्या केंद्र सरकारचा जाहीर निषेध, नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, काँग्रेस व राष्ट्रवादी यांचा केंद्र सरकारला छुपा पाठिंबा आहे, केंद्र सरकार हुकूमशाही करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केला. केंद्र सरकारने अंमलात आणलेले तीनही निर्णय शेतकरी विरोधात आहेत, मंगलसिंग सारख्या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागली ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.

राज्य सरकार केंद्राला विरोध करत असल्याचे भासवत असून जनतेची दिशाभूल करत आहेत परंतु मुळात राज्य सरकार शेतकऱ्यांना दिशाभूल करून राजकारण करत आहे. ज्याप्रमाणे राज्य सरकार केंद्रातील काही कायदे राज्यात लागू करणार नाही अशी भूमिका घेते त्याचप्रमाणे सदरील कायदे आम्ही देशात लागू होऊ देणार नाही अशी भावना दिसून येत नाही. केंद्र सरकारने सदरील शेतकऱ्यांचा विषय संवेदनशील पद्धतीने हाताळून घेतलेले निर्णय रद्द केले नाहीत तर शेतकरी सोबत इतर सर्व वर्गातील जनता केंद्र सरकारला सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही.

औरंगाबाद जिल्ह्यातील आंदोलनामध्ये ऑल इंडिया पँथर सेनेचा, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा व शेतकरी वर्गाचा सक्रिय सहभाग होता तसेच सदरील आंदोलन राज्य प्रवक्ते अमित भुईगळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले त्यावेळी प्रमुख उपस्थिती राज्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे, जिल्हाध्यक्ष योगेश गुलाबराव बन,  प्रभाकर बकले, लता बामणे, शहराध्यक्ष संदीप शिरसाठ, वंदना नरवडे, महासचिव पंकज बनसोडे, रवीकुमार तायडे, उपाध्यक्ष मिलिंद बोर्डे, संघटक बाबा पटेल, बाबासाहेब वाघ, कोषाध्यक्ष शैलेंद्र मिसाळ, श्रीरंग ससाणे, पी के दाभाडे, कन्नड तालुका अध्यक्ष देविदास राठोड, वैजापूर तालुका अध्यक्ष सिद्धार्थ तेझाड, खुलताबाद तालुका अध्यक्ष मुक्तार सय्यद, गंगापूर तालुका अध्यक्ष देविदास लांडे पाटील, सम्यक विद्यार्थी आंदोलन प्रदेश महासचिव प्रकाश इंगळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.