शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची कोरोनावर मात

औरंगाबाद ,दि. १६ : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी कोरोनावर मात केली आहे. आज, १६ डिसेंबर रोजी त्यांची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. ९ डिसेंबर रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना सिग्मा हॉस्पिटलयात दाखल करण्यात आले होते.

माझ्या प्रकृतीची शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई व लोकप्रतिनिधी – प्रशासकीय अधिकारी यांनी आस्थेने विचारपूस केली. आजारपणात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे धीर देणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे.यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, अ‍ॅड. आशुतोष डंख, युवासेना जिल्हा युवाधिकारी तथा नगरसेवक ऋषिकेश खैरे, नगरसेवक सचिन खैरे, कमलेश झवेरी, डॉ उन्मेष टाकळकर, डॉ. ज्ञानेश्वर झडे, डॉ. रोठे, आदींची उपस्थिती होती. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यातील सर्व जनता व तमाम शिवसैनिक यांनी केलेल्या प्रार्थना व दिलेल्या शुभेच्छासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आभार मानले.