न्यू शांतीनिकेतन कॉलनीतील समस्यांसाठी उपोषण

औरंगाबाद, दिनांक १२ :न्यू शांतीनिकेतन मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेत वाढत असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत आणि इतर समस्यांबाबत तक्रारी, अर्ज, विनंत्या करूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांनी गुरुवारी १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून  महापालिकेसमोर उपोषण सुरु केले आहे. गुरुवारी सायंकाळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी दोन दिवसात कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण सोडण्यात आले आहे.

न्यू शांतिनिकेतन मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेचे रहिवाशी असून सोसायटीमध्ये निर्माण होणाऱ्या अडीअडचणींबाबत येथील नागरिकांनी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या कार्यालयात तक्रारी, अर्ज, विनंती केल्या आहेत. परंतु महापालिकेकडून अद्याप ठोक कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. महापालिकेच्या निष्क्रियतेच्याविरोधात येथील नागरिकांनी संस्थेच्या संचालिका ज्योती चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात मुदलियार साहेबराव घुगे देविदास राठोड बनसोडे  लक्ष्मीकांत कुलकर्णी  सुनील मेश्राम बीके त्रिभुवन सहभागी झाले आहेत.

गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर अनेक सभासदांनी संस्था किंवा महानगरपालिका यांची कोणतीही परवानगी न घेता व्यावसायिक इमारती उभ्या केल्या आहेत. काहीजणांनी तर फ्लॅट विक्री करण्यासाठी मोठ्या बिल्डिंग उभ्या केल्या आहेत, एका प्लॉटवर अनेक घरे उभे करून विक्री केली आहे. त्यामुळे महापालिकेचा मालमत्ता कर आणि इतर कर बुडविला जात आहे एवढेच नाही तर या व्यावसायिक इमारती मुळे या गल्लीत मोठ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. या रस्त्यावर लहान मुले नेहमी खेळत असतात परंतु वाढत्या रहदारीमुळे अपघाताचा धोका वाढला आहे, त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अनेकांनी स्वत:च्या जागेसह सार्वजनिक जागेवर वाढीव जागेवर बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. विनापरवाना व्यवसायिक इमारती उभ्या करून विक्री होत असून वाढलेल्या नागरिकांमुळे या भागात पाणी टंचाई निर्माण होऊ लागली आहे.  प्लॉट क्रमांक 54 वर बेकायदेशीर कमर्शियल इमारत उभी करून गाळे विक्री केलेले आहेत. विशेष म्हणजे पार्कींगच्या जागेवर गाळे काढून ते विक्री करण्यात आले आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, न्यू शांतीनिकेतनमधील बीड ग्रुपमध्ये काही घरांना पाणी मिळत नाही. ६० ते ७० टक्के रहिवाशांनी गुंठेवारी भरणा केलेला असताना सर्वांना दीडपट कर आकारणी केलेली आहे, ती रद्द करून नियमानुसार कर लावण्यात यावा. तसेच कॉलनीतील पीआर कार्ड सुद्धा बनविण्यात आलेले असल्याने दीडपट टॅक्स रद्द करावा या मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आले.