देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

औरंगाबाद, दिनांक 12 :

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शरदचंद्र पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त  १२ डिसेंबर रोजी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य 

अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्य कोरोनाशी झुंज देत आहे आणि संपूर्ण राज्यात रक्ताचा तुडवडा निर्माण झाला आहे. सध्यस्थितीत महाराष्ट्रात फक्त ६ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे आणि तो पाहता एक सामाजिक जाणीव म्हणून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आणि संस्थेचे सचिव तथा सतीश चव्हाण यांच्या पुढाकाराने शरदचंद्र पवार  यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात संचालक डॉ. उल्हास 

शिऊरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत   रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला. या 

शिबिरासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्त पेढी आणि लायन्स ब्लड बँक यांना निमंत्रित करण्यात आले होते  या शिबिरात ८६ रक्तदात्यांनी रक्तदान करून ८६ बाटल्यांचे संकलन करण्यात आले.मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. सतीश चव्हाण यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटनकरण्यात आले. या प्रसंगी कोषाध्यक्ष डॉ. अविनाश येळीकर, महाविद्यालयाचे संचालक डॉ. उल्हास शिऊरकर,देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे,विभागप्रमुख डॉ. सत्यवान धोंडगे, डॉ. राजेश औटी, प्रा.प्रकाश तौर, प्रा. संजय कल्याणकर, डॉ. एस. डी. शिंदे, प्रा. रुपेश रेब्बा, प्रा. अच्युत भोसले तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींची उपस्थिती होती.