लोक अदालतीमध्ये 2 हजार 81 प्रकरणांमध्ये तडजोड,50 कौटुंबिक प्रकरण निकाली

औरंगाबाद,दि. 12 :-
 जिल्हा न्यायालयात शनिवारी (दि. 12) आयोजीत राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1419 प्रलंबीत व 662 दाखलपूर्व असे एकुण 2 हजार 81 प्रकरणांमध्ये तडजोड होऊन प्रलंबित प्रकरणांमध्ये 31 कोटी 1 लाख 14 हजार 326 व वादपूर्व प्रकरणांमध्ये एकुण 22 कोटी 29 लाख 3 हजार 398 रुपये इतकी वसुली झाली. एकूण 33 कोटी 24 लाख 7 हजार 724 एवढ्या रक्कमेचा समोवश असलेली प्रकरणे लोकअदालतीमध्ये तडजोडीने मिटली. .  
विशेष म्हजणे कोविड-19 ची पार्श्वभूमी लक्षात घेता, न्यायालयाने एक पथक स्थापन केले होते. न्यायालयात येणार्‍या जाणार्‍या प्रत्येक व्यक्‍तीची हे पथक तपासणी करित सुचना देणयात येत होत्या. तसेच सॅनिटायझरची व्यवस्था देखील करण्यात आली होती अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे न्यायाधीश एस.डि. इंदलकर यांनी दिली. या राष्ट्रीय लोकआदालतीचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्ययाधीश श्रीपाद टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या 662 प्रकरणांमध्ये वित्तीय संस्थांची 22 कोटी 29 लाख 3 हजार 398 रुपयांची रक्कम वसुल झाली. धनादेश अनादरच्या एक हजार प्रकरणांमध्ये तडजोड झाली. 11 भूसंपादन प्रकरण, अपघतात जखमी 92 प्रकरण, 50 कौटुंबिक प्रकरण, 156 दिवाणी प्रकरण, 22 विज चोरी प्रकरण आणि 77 फौजदारी प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ते निकाली काढण्यात आले.
लोकअदालतीच्या तयारीसाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीपाद टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल प्रमुख म्हणुन जिल्हा न्यायाधीश एम.एस. देशपांडे, एम.एन. पाटील, ए.ए. कुलकर्णी, ए.आर. कुरेशी, तदर्थ जिल्हा न्यायाधीश व्ही.एम. सुंदाळे, वैभव व्ही. पाटील, जे.एम. अंबोडकर, सह दिवाणी स्थर न्यायाधीश पी.एस. कुलकर्णी, आर.एम. तुवर, के.आय. खान, पी.एच. जोशी, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच.एस. पुराडउपाध्ये, वाय.जी. दुबे, एस.यू. न्याहारकर, बी.डी. तारे, एस.एम. कादरी, एस.एस. मांजरेकर, ए.एस. वाडकर, ए.जे. पाटील, व्ही.डी. सृंगारे, ए.ए. काळे, एस.एस. दहातोंडे, ए.एस. कांबळे, बी.एम. पोतदार यांनी लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी काम पाहिले.

प्रथमच व्हिडीओ कॉन्फरन्स व्दारे तडजोड
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर प्रथमच व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे तडजोड करण्यात आली. यात हर्सुल कारागृहतील आरोपीला दुसर्‍या एका  मोटार अपघातात एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली. तर धनादेश अनादरच्या सुमारे 90 प्रकरणात व्हाट्सअ‍ॅप व्हीडीओ कॉलींगव्दारे तडजोड करण्यात आली.

भारतीय सेनेतील जवानाला नुकसान भरपाई
जम्मु काश्मिर येथे कार्यरत भारतीय सेनेतील एक जवान कमलापूर चौकातून (रांजणगाव, शेणपूंजी ता. गंगापूर) पायी चालत असतांना एका ट्रॅक्टरने त्यांना धडक दिल्याने ते जखमी झाले होते. प्रकरणात त्यांनी नुकसानभरपाईसाठी दावा केला होता. तो दावा न्यायालयात प्रलंबित होते.  सदर प्रकरणात विमा कंपनीने तडजोड करण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार जवानाला दीड लाख नुकसान भरपाई मिळाली.