छत्रपती शाहू कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचा उत्कृष्ट दर्जा देऊन गौरव

औरंगाबाद : कांचनवाडी येथील  छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचा नुकताच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई तर्फे सर्व विभागांचा (EXCELLENT GRADE) उत्कृष्ट दर्जा देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये संस्थेने तंत्रशिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याचे मुल्याकंन मंडळातर्फे करण्यात आले. 

No photo description available.

विद्यार्थ्याचे  प्रात्यक्षिक ज्ञान अद्यावत करण्यासाठी विविध उद्योगांना भेटी दिल्या जातात तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभण्यासाठी विविध स्वरूपाच्या कार्यशाळा, व्याख्याने इत्यादिंचे नियमित आयोजन केले जाते. महाविद्यालयात मिशन १००% ची संकल्पना राबवली जाते याद्वारे १००% टीचिंग व लर्निंग , १००% अडरस्टॅण्डिंग, १००% विद्यार्थ्यांचे समाधान व १००% निकाल यावर प्रामुख्याने भर दिला जातो. याचाच परिणाम म्हणून  कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकची  सिव्हिल इंजिनीअरिंग  विभागातील विद्यार्थीनी शिवांजली जाधव हिने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून अंतिम वर्षाच्या परीक्षेत तृतीय येण्याचा मान मिळवला. त्याचप्रमाणे मॅथेमॅटिक्स सारख्या विषयांत अनेक विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० मार्क्स मिळवले आहेत. याही वर्षी ९९ % निकाल लावून यशाची परंपरा कायम राखली आहे. १०० पेक्षा जास्त उद्योगांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून याद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. आजपर्यंत जवळपास ३५० हुन अधिक विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नोकरी मिळाली आहे. 

मराठवाड्यातील संस्थांसाठी एम.एस. बी. टी.ई ची  हब अँड स्पोक मॉडेल अंतर्गत हब इन्स्टिटयूट म्हणून  कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक कार्यरत आहे.  त्याचप्रमाणे राज्य स्तरावरील सॅट-कॉम स्किल ट्रेनिंग सेंटर उभारण्यात आले असून याद्वारे विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. छत्रपती शाहू  कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक  मधील अनेक विद्यार्थी तैवान, जर्मनी, रशिया, इंग्लंड इ. देशांमध्ये उच्च शिक्षण घेत असून महाविद्यालयाचे नाव जागतिक पातळीवर उंचावत आहे.                    

शैक्षणिक प्रगतीसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महाविद्यालय प्रयत्नशील असते. यावर्षी अंतरपदविका अभियांत्रिकी विद्यार्थी खेळ संघटनेतर्फे  घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये या तंत्रनिकेतनने महाराष्ट्र राज्यातून क्रिकेटमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. तसेच कॅरम , हॉलीबॉल, कब्बडी यांसारख्या मैदानी खेळांमध्येही विशेष प्राविण्य मिळवले. या सर्व गोष्टी यशस्वीपने राबविण्यासाठी उच्चशिक्षित प्राध्यापकवृंद, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, अद्यावत सुविधा, स्वच्छ व सुंदर परिसर, प्रभावी व्यवस्थापन या सर्व बाबींचा परिणाम म्हणून महाविद्यालयास सतत उत्कृष्ट दर्जा देऊन गौरविले जाते, असे मत प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे यांनी व्यक्त केले.       

सदरील सन्मानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे, सचिव पद्माकरराव मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. उल्हास शिंदे व प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे यांनी सर्व विभागप्रमुख यामध्ये अकॅडेमिक इन्चार्ज प्रा. अनिकेत सोनावणे, प्रा. हरीश रिंगे, प्रा. विकास शहाणे, प्रा.चंद्रशेखर राहणे,प्रा. माधव नरंगले, प्रा. विजय शेळके, प्रा. मनीषा साखरे, प्रा. सागर आव्हाळे, प्रा.धनंजय लांब, प्रा. गिरीष सहाणे, प्रा. कैलास तिडके, प्रा. भारत धनवडे, प्रा. सोनल बोराखडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.