औरंगाबाद जिल्ह्यात 56 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,सहा मृत्यू

जिल्ह्यात 42270 कोरोनामुक्त, 744 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 10 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 96 जणांना (मनपा 71, ग्रामीण 25) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 42270 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 56 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 44180 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1166 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 744 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (45)उस्मानपुरा (1), रेल्वे स्टेशन (1), छावणी परिसर (1), एन-3 सिडको (1), उल्का नगरी (1), बीड बायपास (1), रामनगर (2), पहाडसिंगपुरा (1), रेल्वे स्टेशन परिसर (2), मछली खडक (1), अविष्कार कॉलनी (1), इटखेडा (1), आयोध्या नगर (1), मध्यवर्ती बसस्थानक परिसर (1), हरीप्रसाद नगर (1), एन-11 सिडको (1), हर्सूल (1), शहानूरवाडी (1),अन्य (25)

ग्रामीण (11)मुधलवाडी, पैठण (1), अन्य (10)

सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत पडेगावातील 52 वर्षीय पुरूष, हर्सूल पिसादेवी रोड येथील 61 वर्षीय पुरूष, चौका येथील 60 वर्षीय पुरूष, एन-11 नवजीवन कॉलनी येथील 64 वर्षीय पुरूष, व्दारकानगरातील 72 वर्षीय स्त्री, अजबनगरातील 70 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.