औरंगाबाद जिल्ह्यात 73 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 42051 कोरोनामुक्त, 846 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 8 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 80 जणांना (मनपा 66, ग्रामीण 14) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 42051 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 73 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 44057 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1160 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 846 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (61)उस्मानपुरा (1), बीडबायपास (1), हडको एन-12 (1), चीनार गार्डन, पडेगाव (1), श्रेय नगर (1), सातारा परिसर (1), हर्सूल (1), खडकेश्वर (1), सिडको एन-7 (5), अंबेडकर नगर (1), सिडको एन-9 (1), हमालवाडा (1), सिडको (2), एन-4 हनुमान चौक (1), हतनूर कन्नड (1), देवळाई चौक, बीडबायपास (1), अन्य (40)

ग्रामीण (12)सिल्लोड (1), हतनूर कन्नड (1), वडगाव कोल्हाटी (1), अन्य (9)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

घाटीत फुलंब्रीतील 62 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.