जालना जिल्ह्यात 28 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना दि. 8 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल,डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 18 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआरद्वारे 26 तर अँटीजेन तपासणीद्वारे 2 असे एकुण 28 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 18720 असुन सध्या रुग्णालयात- 227 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6483, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 313 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-94819 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 28 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-12664 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 81743 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने- 85, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5555.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -17, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-5912 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 00, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-25, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-227,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-18, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-11938, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-399,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-195342, मृतांची संख्या-327.जिल्ह्यात एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.