दुसऱ्या विजयासह भारताने जिंकली टी-२० मालिका

धवन, पांड्या, नटराजन्ची चमकदार कामगिरी,ऑस्ट्रेलियाकडून घेतला ‘वन-डे तील पराभवाचा वचपा
Image

सिडनी,
शिखर धवनचे अर्धशतक आणि हार्दिक पांड्याची झंझावात खेळीच्या जोरावर भारताने रविवारी सिडनी मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसèया टी-२० सामन्यात २ चेंडू शिल्लक ठेवित ६ गड्यांनी शानदार विजय नोंदविला. या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आणि वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचा वचपा घेतला.

विजयासाठी १९५ धावांचे लक्ष्य गाठताना शिखर धवनने ३६ चेंडूत ५२ धावांचे, तर कर्णधार विराट कोहलीने २४ चेंडूत ४० धावांचे योगदान दिले. सामन्याचा मानकरी ठरलेल्या हार्दिक पांड्याने २ षट्कार व ३ चौकार ठोकीत २२ चेंडूत नाबाद ४२ धावांची विजयी खेळी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

Image


 
लोकेश राहुल व शिखर धवनने ५६ धावांची सलामी भागीदारी केली. धवनने ४ चौकार व २ षट्कार खेचलेत. कोहलीनेही आपल्या खेळीत २ चौकार व तेवढेच षट्कार खोकलेत. संजू सॅमसने १० चेंडूत १ चौकार व एका षट्कारसह १५ धावांची भर घातली. अ‍ॅण्ड्रयू ते, झाम्पा, सॅम्स व स्वीपसनने प्रत्येकी १ गडी टिपण्यात यश मिळविले.

Image


 
तत्पूर्वी, कोहलीने नाणेफेक qजकून प्रथम गोलंदाजी करण्याचा पर्याय निवडला. अ‍ॅरोन qफचच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करणाèया मॅथ्यू वेडने ३२ चेंडूत ५८ धावा काढल्या. त्याने डीआर्क शॉर्टसोबत ४७ धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर स्टीव्ह स्मिथने ३८ चेंडूत ४६ धावांची भर घातली. स्मिथ चहलच्या फिरकीत अडकला. ग्लेन मॅक्सवेल, हेन्रीक्सने थोडीफार झुंज दिली. स्टोइनिस व डॅनियल सॅम्सने नाबाद खेळी करीत संघाला ५ बाद १९४ धावांचा टप्पा गाठून दिला. भारताकडून टी. नटराजन्ने आपला फॉर्म कायम राखत चार षटकात २० धावांत २ बळी टिपले.
 
धावफलक
ऑस्ट्रेलिया : २० षटकात ५ बाद १९४.

  • मॅथ्यू वेड धावबाद (कोहली/राहुल) ५८, डीआर्क शॉर्ट झे. अय्यर गो. नटराजन् ०९, स्टीव्ह स्मिथ झे. पांड्या गो. चहल ४६, ग्लेन मॅक्सवेल झे. वॉqशग्टन सुंदर गो. ठाकूर २२, मोइजेस हेन्रीक्स झे. राहुल गो. नटराजन् २६, मार्कस स्टोइनिस नाबाद १६, डॅनियल सॅम्स नाबाद ०८, अवांतर ०९.
     
    गडी बाद क्रम : १-४७, २-७५, ३-१२०, ४-१६८, ५-१७१.
     
    गोलंदाजी : दीपक चहर ४-०-४८-०, वॉqशग्टन सुंदर ४-०-३५-०, शार्दुल ठाकूर ४-०-३९-१, टी. नटराजन् ४-०-२०-२, युजवेंद्र चहल ४-०-५१-१.
     
    भारत : १९.४ षटकात ४ बाद १९४.
  • लोकेश राहुल झे. स्वीपसन गो. ते ३०, शिखर धवन झे. स्वीपसन गो. झाम्पा ५२, विराट कोहली झे. वेड गो. सॅम्स ४०, संजू सॅमसन झे. स्मिथ गो. स्वीपसन १५, हार्दिक पांड्या नाबाद ४२, श्रेयस अय्यर नाबाद १२, अवांतर ४.
      
    गडी बाद क्रम : १-५६, २-९५, ३-१२०, ४-१४९.
     
    गोलंदाजी : डॅनियल सॅम्स ३.४-०-४१-१, सिन अ‍ॅबोट २-०-१७-०, अ‍ॅण्ड्रयू ते ४-०-४७-१, ग्लेन मॅक्सवेल १-०-१९-०, स्वीपसन ४-०-२५-१, मोइजेस हेन्रीक्स १-०-९-०, अ‍ॅडम झाम्पा ४-०-३६-१.