औरंगाबाद जिल्ह्यात 41680 कोरोनामुक्त, 926 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 4 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 172 जणांना (मनपा 156, ग्रामीण 16) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 41680 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 104 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 43760 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1154 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 926 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा(85) पुष्पनगरी समर्थनगर (1),सातारापरिसर (1), वर्धमान रेसीडेन्सी , गारखेडा (1), श्री. कृष्ण नगर, एन 9 (1), नंदनवनकॉलनी, छावणी (1), विठ्ठल नगर, मुकुंदवाडी (1), कांचन नगर पैठण रोड परीसर (1),मोतीवाला कॉलनी, चिकलठाणा (1), रेणूकानगर, शिवाजी नगर(1), उल्कानगरी (1), यशोधरा कॉलनी, सिडको (1), नवनाथ नगर,हडको (1),एन-9 हडको (1), गुलमोहरकॉलनी,एन 5 सिडको (1),दिशा नगरी (1), मल्हार चौक (1),गजानन कॉलनी (1), भानुदास नगर (1), स्वप्न नगर (1), एन 4 सिडको(2), म्हाडा कॉलनी (1), बीड बायपास परिसर (1), छावणी पोलीस स्टेशन (1), स्नेह नगर,क्रांती चौक परिसर (1),संत गाडगे महाराज शहरी बेघर निवास, रेल्वे स्टेशन (1), कांचनवाडी(3), एन 8 सिडको (1),राजेश नगरबीड बाय पास (1) सदगुरु कृपा हौसींग सो. (1), गारखेडा परिसर (1), बीड बाय पास परिसर(1), अन्य (51)

ग्रामीण (19) वाहेगाव,गंगापूर (1), वासडी, कन्नड (1), करमाड (1),मल्हारवाडी(3), लासूर स्टेशन (1), शिवूर बंगला , वैजापूर(1), फुलब्री पोलीस स्टेशन (1),जानेफळ (1), अन्य (9)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू घाटीत बीड बायपास देवळाई येथील 77 वर्षीय स्त्री कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.