भारतातील सक्रिय रूग्णसंख्येत सातत्याने घट

रूग्णांच्या तुलनेत सक्रिय रूग्णांची संख्या 4.5% पेक्षा कमी

नवी दिल्‍ली, 3 डिसेंबर 2020

भारतात गेल्या 24 तासांत नव्याने कोविड संसर्ग होणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत बरे होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात भारतात 35,551 व्यक्तींना कोविडचा संसर्ग झाला आहे तर 40,726 रूग्ण या आजारातून बरे झाले आहेत. परिणामी गेल्या 24 तासांत एकूण 5,701 सक्रिय प्रकरणांची निव्वळ घट झाली आहे.गेले सहा दिवस सातत्याने नव्या रूग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत आहे.

Image

भारतातील एकूण रूग्णांच्या तुलनेत सक्रिय रूग्णांची संख्या 4.5% पेक्षा कमी झाली आहे.देशात नव्याने कोविड संसर्ग होणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण वाढल्यामुळे सक्रिय रूग्णसंख्येत सातत्याने घट होते आहे. सध्या भारतातील कोविडग्रस्त रूग्णांची एकूण संख्या 4,22,943 इतकी आहे. अर्थात भारतातील एकूण बाधित रूग्णसंख्येच्या तुलनेत सक्रिय रूग्णसंख्येची टक्केवारी केवळ 4.44 टक्के इतकी झाली आहे.कोविड बाधित रूग्ण बरे होण्याच्या दरात सुधारणा झाली असून तो आता 94.11% इतका झाला आहे. कोविड संसर्गातून पूर्ण बरे झालेल्यांची एकूण संख्या 89,73,373 झाली आहे. रोगमुक्त होणारे आणि नव्याने बाधित यांच्या संख्येतील तफावतही वाढत असून सध्या ही तफावत 85,50,430 इतकी झाली आहे.

उपचारानंतर बरे झालेल्या कोविड-19 ग्रस्त रूग्णांपैकी 77.64% जण हे देशातील दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशातले आहेत.केरळमध्ये सर्वात जास्त म्हणजेच 5,924 रूग्ण उपचारानंतर बरे झाले. त्याखालोखाल दिल्लीतील 5,329 आणि महाराष्ट्रातील 3,796 रूग्ण बरे झाले.

नोंद झालेल्या नव्या रूग्णांपैकी 75.5% रूग्ण हे देशातील दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशातले आहेत.केरळमध्ये गेल्या 24 तासात 6,316 रूग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल नवी दिल्लीत 3,944 तर महाराष्ट्रात 3,350 नवे रूग्ण आढळून आले.देशभरात गेल्या 24 तासात 526 कोविड रूग्ण दगावले, त्यातील 79.28% रूग्ण देशातील 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातले होते.महाराष्ट्रात 21.10% अर्थात 111 रूग्ण मृत्युमुखी पडले. त्याखालोखाल दिल्लीत 82 तर पश्चिम बंगालमध्ये 51 रूग्ण दगावले.

महाराष्ट्र अपडेटस

महाराष्ट्रातील कोविड -19 रुग्णसंख्या आणि या आजारामुळे झालेल्या मृत्यूच्या संख्येत ऑक्टोबर आणि सप्टेंबरच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात जवळपास 50 टक्क्यांची घट झाली आहे. ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात 293,960 कोविड-19 रुग्णांची नोंद झाली, ती नोव्हेंबरमध्ये 50.5 टक्क्यांनी घसरून 145,490 वर आली आहे. ऑक्टोबरमध्ये 7249 मृत्यूची नोंद झाली होती, ती नोव्हेंबरमध्ये 49.09 टक्क्यांनी घसरून 3,690 वर गेली. राज्यात पॉझिटीव्हीटी दरही 7.7 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 88,537 आहे.