जालना जिल्ह्यात 16 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह,तीन मृत्यु

जालना दि. 3 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल,डेडीके कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 9 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआरद्वारे 16 तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 16 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 18597 असुन सध्या रुग्णालयात- 240 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6379, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-662 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-93263 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-16 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-12500 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 79978 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-458, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5459.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -07, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-5846 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 02, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-19, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-240,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-04, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-09, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-11813, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-364,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-194482 ,मृतांची संख्या-323.जिल्ह्यात तीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.