परभणी जिल्ह्यात 154 रुग्णांवर उपचार सुरू, 18 रुग्णांची वाढ

परभणी, दि. 3 :- जिल्ह्यातील 18 रुग्णांचे अहवाल दि.2 डिसेंबर 2020 रोजी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7161 एवढी झाली आहे. त्यापैकी 6718 बरे झाले तर 289 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 154 जणांवर उपचार सुरु असून दि.2 डिसेंबर रोजी एकुण 21 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सूट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकुण 1 हजार 740 बेड उपलब्ध असून ॲक्टीव्ह बेड 154 तर व्हॅकन्ट बेड 1 हजार 586 आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.