औरंगाबाद जिल्ह्यात 95 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 41306 कोरोनामुक्त,1018 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 01 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 66 जणांना (मनपा 59 , ग्रामीण 07) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 41306 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 95 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 43473 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1149 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1018 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (83) रेल्वे स्टेशन परिसर (10), कमलनयन बजाज हॉस्पीटल परिसर (1), गारखेडा परिसर (7), जवाहर नगर पोलिस स्टेशन परिसर (1), शहागंज परिसर (1), अंगुरीबाग (1), साई परिसर (1), एन सात बजरंग कॉलनी (2), गजानन नगर, गारखेडा परिसर (2), शिवाजी नगर (1), अथर्व क्लासिक (1), देवानगरी (1), दशमेश नगर (1), सातारा परिसर (3), गजानन कॉलनी (1), देवळाई चौक परिसर (3), हनुमान नगर (1), उत्तम नगरी, चिकलठाणा (1), विमानतळ परिसर (1), अलोक नगर, सातारा परिसर (1), अहिंसा नगर (1), कोटला कॉलनी (1), जवाहर कॉलनी, विष्णू नगर (3), नवनाथ नगर (1), आनंदवन सो., (1), हडको एन बारा (1), नारेगाव गल्ली (1), एमएचबी कॉलनी, चंपा चौक (1), ज्योती नगर (1), ,एन सात सिडको (1), जुना मोंढा, ढोलपुरा (1), पारिजात नगर, एन चार सिडको (1) सिडको (1), ज्युबली पार्क (1), सन्मित्र कॉलनी (1), झाल्टा फाटा (1), सारा सिटी पैठण रोड (1), सुधाकर नगर (1) , अन्य (22)

ग्रामीण (12) रांजणगाव शेणपुजी (1), नेवपूर, कन्नड (1), सरस्वती कॉलनी, गेवराई (1), जिवराग टाकळी (1),रांजणगाव (1), अन्य (7)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

घाटीत कन्नड तालुक्यातील बरकतपूर येथील 70 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.