हिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 15 रुग्ण ;106 रुग्णांवर उपचार सुरु

हिंगोली,दि. 01 : जिल्ह्यात 15 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 02 व्यक्ती , औंढा परिसरात 01 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे वसमत परिसरात 02 व्यक्ती, हिंगोली परिसरात 07 व्यक्ती व कळमनुरी परिसरात 03 व्यक्ती असे एकूण 15 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 09 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 04 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन सुरू आहे़, तर 01 कोविड-19 रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशा प्रकारे आज रोजी एकूण 05 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून सद्य:स्थितीत तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजार 380 रुग्ण झाले असून, त्यापैकी 3 हजार 222 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 106 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 52 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.