औरंगाबाद पदवीधर निवडणूक: भाजप व राष्ट्रवादीची एकमेकांवर चिखलफेक

औरंगाबाद ,दि.29 :-  औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीच्या प्रचाराची रविवारी सांगता झाली . प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांनी एकमेकांवर चिखलफेक केली आहे. भाजपच्या “त्या ऑडिओ क्लिप” चा उमेदवार सतीश चव्हाण यांच्याकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे. भाजपचे आमदार व माजी मंत्री यांनी सतीश चव्हाण हे सचिव म्हणून कार्यरत असलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गैरकारभाराची चौकशीची मागणी केली आहे. 

भाजपच्या “त्या ऑडिओ क्लिप” चा उमेदवार सतीश चव्हाण यांच्याकडून जाहीर निषेध

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची प्रक्रिया चालु असतांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांचा ध्वनीमुद्रीत आवाज गुंटुर येथील मोबाईल वरुन सुपरइंपोज करुन तसेच त्या पाठोपाठ एका स्थानिक त्रिस्तरीय भाजपा नेत्यांचा आवाजात विरोधी पक्षाचा उमेदवाराच्या (भाजप) प्रचाराचा आडीओ मेसेज चालवला जात आहे. भाजपला आपला पराभव दिसतोय त्यामुळे असे उपद्व्याप ते करत आहेत. त्यांच्या या कृतीचा आम्ही जाहीर निषेध करतो, अशा शब्दात महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच या संबंधित व्यक्तीच्या विरोधात मी निवडणूक निर्वाचन अधिकारी तसेच औरंगाबाद पोलीस आयुक्तांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे तसेच संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची प्रक्रिया चालु असतांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांचा ध्वनीमुद्रीत आवाज गुंटुर येथील मोबाईल वरुन सुपरइंपोज करुन तसेच त्या पाठोपाठ एका स्थानिक त्रिस्तरीय भाजपा नेत्यांचा आवाजात विरोधी पक्षाचा उमेदवाराच्या (भाजप) प्रचाराचा आडीओ मेसेज चालवला जात आहे. Tru कॉलरवर ८६३४५१२४५४ हा मोबाईल नंबर खासदार सुप्रियाताई सुळे यांचा वैयक्तीक असल्याचे बेमालुमपणे भासवले आहे. 
हे अतिशय निंदनीय राजकारण असून विरोधी पक्षाचा (भाजपा) बॅलट पध्दतीवर विश्वास नसल्याचे निदर्शक आहे. त्यामुळे मोबाईल क्रमांका संबंधी केल्या गेलेल्या तंत्रज्ञानाच्या फसव्या करामतीची दखल घेणे आवश्यक आहे. तरी कृपया निवडणूक आयोग तसेच संबंधीत यंत्रनानी या करामतीच्या मागील व्यक्तींना शोधून काढून योग्य ती कार्यवाही व संबंधीतास योग्य ते शासन करावे अशी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना मित्र पक्ष आघाडी चे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांनी केली आहे.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची चौकशी करावी- आ संभाजी पाटील यांची मागणी

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ हे गैरकारभाराचे केंद्र बनले आहे. कर्मचारी वर्गाचे शोषण आणि भ्रष्टाचार याचे कुरण बनलेल्या या शिक्षण प्रसारक मंडळाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी  माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली. ज्येष्ठ उद्योजक मानसिंग पवार यांच्या भेटीनंतर त्यांनी ही मागणी केली.

विद्यापीठ प्रशासन, कुलपती असलेले राज्यपाल आणि धर्मदाय आयुक्त यांच्याकडे ही मागणी करण्यात येणार आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत आहेत. संस्थेचे संचालक मंडळच नियमबाह्य पणे अस्तित्वात आले आहे. या बाबत उच्च न्यायालयात खटला चालू आहे. संचालक मंडळाच्या बदलाला आजवर धर्मदाय आयुक्त यांची मंजुरी मिळालेली नाही. नियमबाह्य पणे अस्तित्वात आलेले संचालक मंडळ नियम डावलून सगळी कामे करत आहे. यात मोठा आर्थिक गैरव्यवहार देखील आहे. नौकर भरती विनाअनुदानित कर्मचाऱ्यांचे वेतन या सगळ्याच गोष्टी संशयाच्या घेऱ्यात असून  त्याची चौकशी आवश्यक असल्याचे निलंगेकर म्हणतात. 

मराठवाड्यातील मोठी आणि बहुजन वर्गाची असलेली ही संस्था अधिक मोठी आणि चांगली होणे आवश्यक आहे. मात्र मागील काही वर्षात या संस्थेवर विशिष्ट वर्गाचे हित करणारी मंडळी बसली असल्याचा आरोप निलंगेकर यांनी केला. औरंगाबाद मधील काही जबाबदार मंडळी या बाबत लढा देत आहेत या  मंडळींना सहकार्य करण्याची आपली भूमिका असून मंडळाच्या गैरकारभाराविरुद्ध लढा देणाऱ्या मंडळींना आपण नक्कीच बळ देऊ असे निलंगेकर म्हणाले. राज्य सरकार या बाबीकडे दुर्लक्ष करणार असेल तर राज्यपाल महोदय आणि युजीसीकडे देखील आपण पाठपुरावा करू असे निलंगेकर यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितले