दुसर्‍या परिक्षार्थीच्या हॉलतिकिटवर परिक्षा देणारा  मुन्‍नाभाई गजाआड

Aurangabad Police | Police Station

औरंगाबाद, दिनांक 28 :दुसर्‍या परिक्षार्थीच्या हॉलतिकिटवर परिक्षा देणार्‍या मुन्‍नाभाईला एमआयडीसी सिडको पोलिसांनी शनिवारी दि. 28 पहाटे गजाआड केले. अर्जून बाबुलाल बिघोत (26, रा. जवखेडा बु्र पोस्ट सारोळा ता. कन्‍नड) असे आरोपीचे नाव असून त्याला 30 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी दिले.
प्रकरणात टाटा कंन्सलटन्सी सर्विसेसचे आय कॉन डिजिटल झोन केंद्रप्रमुख मनोज प्रभाकर अंबाडे (22, रा. म्हाडा कॉलनी, चिलठाणा) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, 27 नोव्हेंबर रोजी आय कॉन डिजिटल झोनवर दिल्‍ली पोलीस कॉन्स्टेबलची परिक्षा कंडक्ट करण्यात आली होती. सदर परिक्षेसाठी 900 पैकी 450 परिक्षार्थींनी हजेरी लावली होती. ऑनलाईन परिक्षा नउ वाजता सुरु झाली. ग्राउंन्ड फ्लोअरच्या एफ ब्लॉकवर परिवेक्षक म्हणुन अक्षय बागडे हे हजर होते. परिक्षा सुरु असतांना आयटी मॅनेजर प्रशांत महाकाळ यांना एका परिक्षार्थ्यावर संशय आला. त्यांनी त्या परिक्षार्थ्याची झडती घेतली असता तो दुसर्‍याच्या हॉलतिकिटवर परिक्षा देत असल्याचे समोर आले. त्याच्याकडे मोबाइल, एटीएम ट्रान्समीटर, ब्ल्यूटूथ डिव्हाईस, मख्खी एअर फोन आदी साहित्य सापडले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव अर्जून बिघोत असून, मीत्र अमोल गडवेच्या जागेवर परिक्षा देत असल्याचे  सांगितले. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता गुन्हा गंभीर असून गुन्ह्यात मोठे रॅकेट सर्किय असण्याची शक्यता आहे. आरोपीला गुन्ह्यात कोणी कोणी मदत केली याचा तपास करणे आहे. आरोपी अमोल गडवे याला अटक करणे आहे. आरोपीने यापूर्वी असा गुन्हा केला आहे का याचा तपास करणे आहे. आरोपीने गुन्ह्यात वापरलेले एटीएम ट्रान्समीटर, ब्ल्यूटूथ डिव्हाईस, मख्खी एअर फोन आदी फोन कोठुन आणले याचा तपास करणे असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील ए.व्ही. घुगे यांनी न्यायालयाकडे केली.