पंतप्रधानांची अहमदाबादेतील झायडस बायोटेक पार्कला भेट

अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादेतील झायडस बायोटेक पार्कला भेट दिली. येथील झायडस केडिला मध्ये डीएनए वर आधारित स्वदेशी लस विकसित होत आहे त्याबद्द्ल जास्त माहिती घेणे हा या भेटीमागील उद्देश होता.

“झायडस केडिला मध्ये तयार होत असलेल्या डीएनएवर आधारित स्वदेशी लसीबाबत अधिक माहीती जाणून घेण्यासाठी आज अहमदाबादेतील झायडस बायोटेक पार्कला भेट दिली. या कामासाठी परिश्रम घेत असलेल्या टीमचे मी कौतुक करतो.. त्यांच्या या कार्यप्रवासात भारत सरकार नेहमीच त्यांच्या सोबत आहे.” , असे पंतप्रधानांनी  आपल्या ट्विट संदेशात नमूद केले आहे.

पंतप्रधानांनी हैदराबादमधील भारत बायोटेकला दिली भेट
Image

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, लस विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठीच्या तीन शहरांच्या आपल्या दौऱ्यादरम्यान आज हैदराबाद मधील भारत बायोटेक सुविधा केंद्राला भेट दिली.

“स्वदेशी कोविड लसीबद्दल हैदराबाद येथील भारत बायोटेक सुविधा केंद्रामध्ये माहिती देण्यात आली. लसीसंदर्भात आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये झालेल्या प्रगतीबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. त्यांची टीम या कार्यात वेगाने प्रगती व्हावी यासाठी आयसीएमआर बरोबर काम करत आहेत.”, असे पंतप्रधानांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.