नांदेड जिल्ह्यात 35 कोरोना बाधितांची भर

नांदेड (जिमाका) दि. 26 :- गुरुवार 26 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 35 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 20 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 15 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 34 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या एकुण 955 अहवालापैकी 914 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 196 एवढी झाली असून यातील 19 हजार 50 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 407 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 15 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आज प्राप्त अहवालानुसार एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 547 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 15, मुखेड कोविड रुग्णालय व गृहविलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 12, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल 2, औरंगाबाद येथे संदर्भित 1, हैदराबाद येथे संदर्भित 1 असे एकूण 34 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.32 टक्के आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 45 हजार 401निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 21 हजार 315एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 196एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 50एकूण मृत्यू संख्या- 547उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.32 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-5आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-446रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-407आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-15.