औरंगाबाद जिल्ह्यात 111 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 40790 कोरोनामुक्त, 829 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 25 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 83 जणांना (मनपा 68, ग्रामीण 15) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 40790 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 111 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 42757 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1138 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 829 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा( 89) नगर नाका (2), पन्नालाल नगर (1), माळीवाडा (1), देवळाई रोड (1), शिवाजीनगर (1), कांचनवाडी (1), पडेगाव पोलिस कॉलनी (1), गुलमोहर कॉलनी, पडेगाव (1), शिवकॉलनी, मयूर पार्क (1), शिवशंकर कॉलनी (1), एसबीआय सिडको (1), कैसर कॉलनी (1), चिंतामणी कॉलनी (1), म्हसके गल्ली, पडेगाव (1), मनपा परिसर (1), न्यू गणेश नगर (1), संकल्प नगर, जाधववाडी (2), पारिजात नगर (2), एन दोन सिडको (1), चिखलठाणा (1), शहानूरवाडी (2), एमआयटी स्वामी विवेकानंद अकादमी (1), एमआयटी शाळा (1), बीड बायपास (3), पेशवेनगर (1), जवाहर कॉलनी (1), एन तीन सिडको (1), हर्सुल, पिसादेवी (1), संत ज्ञानेश्वर नगर, सिडको (1), द्वारकानगर (1), घाटी परिसर (1), जाधववाडी (1), जालन नगर (1), एन सहा, सिडको (1), गजानन कॉलनी (1),एन पाच, सिडको (1), देवळाई चौक (1), सर्वेश्वर नगर (1), सातारा परिसर (2), आकाशवाणी (1), गारखेडा परिसर (1), अन्य (41)

ग्रामीण (22) पिंपळवाडी, पैठण (1), बाजारसावंगी (1), लोणी (1), पैठण (1), भालगाव (1), शिक्षानगर, सिल्लोड (1), अन्य (16)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

घाटीत वैजापूर तालुक्यातील पाथरी येथील 70 वर्षीय स्त्री कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.