शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीचा फेरा

Image

ठाणे: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) अधिकारी पोहोचले आहेत. त्यांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीदेखील ईडीचे पथक दाखल झाले आहे. त्यांच्या कार्यालयांमध्येही ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. सध्या प्रताप सरनाईक परदेशात आहेत. त्यांनीदेखील या माहितीला दुजोरीला दिला आहे. पण ईडी कोणत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोहोचली आहे, याचा तपशील आपल्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले.
 आज सकाळी आठच्या सुमारास ईडीची तीन पथकं तपासासाठी पोहोचली. त्यांनी आमदार प्रताप सरनाईक, त्यांचे दोन पुत्र आणि त्यांच्या कार्यालयात तपास सुरू केला. ईडी नेमक्या कोणत्या प्रकरणात तपास करत आहे, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. सीआरपीएफच्या ४० जवानांच्या बरोबरीने ईडीचे अधिकारी चौकशीसाठी सरनाईक यांच्या घरी पोहोचले. एकूण दहा ठिकाणी मुंबई, ठाणे, पुणे परिसरात शोध सुरु आहे. टॉप ग्रुपसंबंधी ही कारवाई करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार टॉप ग्रुपचे प्रमोटर्स आणि सदस्यांच्या घरी आणि कार्यालयात ही शोधमोहीम सुरु आहे.
 प्रताप सरनाईक यांच्या घरी, कार्यालयात ईडीचे अधिकारी पोहोचल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ‘मनी लॉण्ड्रिंगसारख्या प्रकरणात शिवसेना पटाईत आहेत. त्यांचे मुखिया यामध्ये अग्रेसर आहेत. त्यामुळे मला याबद्दल कोणतंही आश्चर्य वाटत नाही. मुंबई महापालिकेत माफिया राज असल्याचा आरोप मी आधीही केला आहे. पालिकेतून कंत्राट, भागिदारीतून प्रचंड पैसा येत असतो,’ याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

शिवसेनेच्या सर्व भ्रष्टाचारी नेत्यांची चौकशी करा!

मुंबई : शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने शोधमोहिम सुरू केली. तसेच या प्रकरणासंदर्भात एकूण १० ठिकाणी शोधमोहिम सुरू केली आहे. त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. यावरून राजकीय कलगी तुरा रंगला आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीही आता नेहमीप्रमाणे शिवसेनेला लक्ष्य केले आहे.
निरुपम म्हणाले, “शिवसेना भ्रष्टाचारी आहे. भ्रष्टाचारातून कमावलेली संपत्ती शिवसेनेच्या नेत्यांकडे आहे. हे मला माहित नाही की, सरनाईक यांनी काय काय केले पण, याप्रकरणी राजकारण न होता, प्रताप सरनाईक यांची चौकशी व्हायला हवी’ केवळ सरनाईकच नव्हे तर शिवसेनेच्या इतर अनेक नेत्यांनी भ्रष्टाचारातून भरपूर संपत्ती गोळा केली. फक्त राजकीय द्वेशातून या प्रकरणाकडे न पाहता, त्या सर्वांचीही ईडीमार्फत चौकशी व्हावी,’ अशी मागणी त्यांनी केली.

ईडीची कारवाई ही भाजपच्या राजकीय षढयंत्राचा भाग, कॉंग्रेसची टीका

मुंबई : प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीचा छापा हा राजकीय षढयंत्राचा एक भाग आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्ये देखील हे झालंय. दबावाच राजकारण करण्यासाठी भाजप हे करतं. भाजपच्या नेत्यांवर अशी कारवाई कधी होताना दिसत नाही. भाजपचा विरोध केला तर अशा कारवाई होणार हे अपेक्षित असल्याची टीका कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलीय. 

शिवसेना आमदार आणि प्रवक्ते प्रताप सरनाईक (Pratap Sirnaik) यांच्या ठाण्यातील घरी ईडीचे (ED) पथक दाखल झालंय. पूर्वश ,विहंग सरनाईक यांच्या घरी देखील ईडी अधिकारी पोहोचले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सरनाईक कुटुंबांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी सुरु आहे. 

ईडी होमवर्कपेक्षा जाणार नाहीत. शिवसेनेचे नेते पैसे बोगस कंपन्यांमध्ये गुंतवतात हे मला माहीतेय. त्यांनी भ्रष्टाचाराचा बेनामी पैसा लाटला असेल तर कारवाई व्हायला हवी अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिलीय.