भारतामध्ये दररोज 40,000 पेक्षा कमी नवीन रुग्णांची नोंद

सक्रीय रुग्ण संख्येत निरंतर घट होत असून 4.4 लाखांहून कमी सक्रीय रुग्णांची नोंद
Image

दिल्ली-मुंबई, 24 नोव्हेंबर 2020

सहा दिवसानंतर भारतात दररोज नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्या 40,000 पेक्षा कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत दररोज नोंद होणाऱ्या नवीन रुग्णांची संख्या 37,975 इतकी आहे. 8 नोव्हेंबरपासून मागील सलग 17 व्या दिवशी दररोज नोंद होणाऱ्या नवीन रुग्णांचा आकडा 50,000 च्या खाली आहे.

देशातील 2,134 प्रयोगशाळांच्या माध्यमातून भारताच्या चाचणी सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण वाढ झाली आहे. दररोज दहा लाखांहून अधिक चाचण्या करण्याच्या आपल्या वचनबद्धतेस  अनुसरून गेल्या 24 तासांत 10,99,545 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. भारताच्या एकूण एकत्रित चाचण्यांनी  13.3 कोटीचा  (13,36,82,275) टप्पा पार केला आहे.आज एकत्रित राष्ट्रीय बाधित रुग्ण दर 7 टक्क्यांपेक्षा कमी होऊन 6.87% झाला आहे. दैनंदिन बाधित रुग्ण दर 3.45% झाला आहे. चाचणीचे प्रमाण वाढल्याने बाधित रुग्ण दर कमी होण्यास मदत झाली आहे.

प्रति दशलक्ष (टीपीएम) चाचण्यांचे प्रमाण वाढून 96,871 झाले आहे.गेल्या काही आठवड्यांपासून सक्रिय रुग्ण संख्येत सातत्याने घट झाली आहे.गेल्या 24 तासात 42,314 रुग्ण बरे झाले असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. सक्रीय रुग्ण संख्येत घट होऊन ती  4,38,667 झाली आहे. निरंतर होत असलेल्या घसरणीमुळे देशात सध्या 4.78% बाधित रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर देखील 93.76% पर्यंत वृद्धिंगत झाला आहे. आतापर्यंत 86,04,955 रुग्ण बरे झाले आहेत.

बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 75.71 टक्के रुग्ण 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशातले आहेत.दिल्लीत काल सर्वाधिक 7216 नवीन रुग्ण बरे झाले असून केरळमध्ये 5,425  आणि त्यानंतर महाराष्ट्रात 3,729 लोक बरे झाले आहेतकाल नव्याने  नोंद झालेल्या रुग्णांपैकी 77.04% रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

दिल्लीत काल एका दिवसात सर्वाधिक 4,454 नवीन रुग्ण आढळले तर त्या खालोखाल  महाराष्ट्रात 4,153 नवे रुग्ण आढळले.गेल्या 24 तासात 480 मृत्यूची नोंद झाली.  नवीन मृत्यूंपैकी 73.54% 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. यापैकी दिल्लीत 121  तर  पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रामध्ये अनुक्रमे 47 आणि 30 मृत्यू झाले.