महाविकास आघाडी सरकार बेईमानी करून आलेले सरकार- देवेंद्र फडणवीस

Image
संघटन हीच भारतीय जनता पार्टीची फार मोठी शक्ती आहे, सर्वांत मोठी ताकद आहे! औरंगाबाद येथे आज बुथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला आज उपस्थित राहून संबोधित केले. सरकारकडून सातत्याने मराठवाड्यावर अन्याय, शेतकर्‍यांप्रति अनास्था, प्रकल्पांवर स्थगिती अशा अनेक बाबतीत विचार व्यक्त केले.

औरंगाबाद: पदवीधर मतदारासंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार बेईमानी करून आलेले सरकार आहे. हे सरकार किती काळ टिकेल हे माहीत नाही. त्यामुळे यावर आता बोलणे योग्य नाही. मात्र, या पुढे पहाटे नाही तर योग्य वेळी शपथ घेतली जाईल तसेच अशा गोष्टी आठवणीत ठेवायच्या नसतात, असे ते म्हणाले. फडणवीसांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Image

‘भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी स्वतः 6 वर्षांपूर्वी शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली होती’ असंही ते म्हणाले. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या अकाली निधनानंतर कार्यकर्ते निवडणुकीच्या मनस्थितीत नव्हते. ज्यामुळे 54 हजार मतं मिळूनही शिरीष बोराळकरांना पराभव पत्करावा लागला होता. परंतु ह्या वेळच्या निवडणुकीत मात्र सर्व सुशिक्षित आणि सुजाण पदवीधर भाजपला मोठ्या संख्येने मतं देतील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

कोरोना काळात राज्य सरकारने कोणालाही पॅकेज दिलं नाही, कोणालाही फुटक्या कवडीची मदत केली नाही. काही झालं तरी फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याचं काम राज्य सरकारने केलं असल्याची खोचक टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य सरकारने कोरोना काळात कोणाला मदत केली नाही. शेतकऱ्यांना, दुकानदारांना किंवा रिक्षावाल्यांही सरकारने मदत केली नाही. तर दुसरीकडे मात्र छोट्या राज्यांनी त्याठिकाणी मदत केली पण महाराष्ट्र सरकारने कोणतीच मदत केली नसल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कोरोना काळात राज्य सरकारने कोणालाही पॅकेज दिलं नाही, कोणालाही फुटक्या कवडीची मदत केली नाही. काही झालं तरी फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याचं काम राज्य सरकारने केलं असल्याची खोचक टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य सरकारने कोरोना काळात कोणाला मदत केली नाही. शेतकऱ्यांना, दुकानदारांना किंवा रिक्षावाल्यांही सरकारने मदत केली नाही. तर दुसरीकडे मात्र छोट्या राज्यांनी त्याठिकाणी मदत केली पण महाराष्ट्र सरकारने कोणतीच मदत केली नसल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

याशिवाय मराठवाड्यातील इतर विद्यमान आमदारांविषयी व विद्यमान सरकारविषयी जनतेमध्ये प्रचंड नाराजी असल्याचेही फडणवीस ह्यावेळी म्हणाले. मुळात हे सरकार जनतेनं निवडून दिलेलं नाही तर बेईमानीनं आलेलं आहे असं स्पष्ट मत व्यक्त करत सरकारच्या इतर धोरणांवरही त्यांनी ताशेरे ओढले.

मागील वर्षी आजच्या दिवशी अख्खा महाराष्ट्र साखर झोपेत असताना राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्यावर्षी आजच्या दिवशी सरकार स्थापन केले होते. त्यावरून सोशल मीडियावर दोन्ही नेत्यांची खिल्ली उडवली जात आहे. त्यावर आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल, असे विधान फडणवीस यांनी केले आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याचे वृत्त होते. मात्र फडणवीस यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. ज्या दिवशी माध्यमांकडे बातम्या नसतात, त्या दिवशी पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या दाखवल्या जातात, असे ते म्हणाले.