परभणी जिल्ह्यात 96 रुग्णांवर उपचार सुरू, 10 रुग्णांची वाढ

परभणी, दि. 23 :- जिल्ह्यातील 10 रुग्णांचे अहवाल रविवार दि.22 नोव्हेंबर 2020 रोजी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6983 एवढी झाली आहे. त्यापैकी 6601 बरे झाले तर 286 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 96 जणांवर उपचार सुरु असून रविवार दि.22 नोव्हेंबर रोजी एकुण 8 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सूट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकुण 1 हजार 711 बेड उपलब्ध असून ॲक्टीव्ह बेड 96 तर व्हॅकन्ट बेड 1 हजार 615 आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.