औरंगाबाद जिल्ह्यात 113 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,तीन मृत्यू

जिल्ह्यात 40502 कोरोनामुक्त, 723 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 22 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 44 जणांना (मनपा 20, ग्रामीण 24) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 40502 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 113 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 42359 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1134 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 723 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (101) नागेश्वरवाडी (1), दादोजी कोंडदेव उच्च माध्यमिक विद्यालय (1), भाग्य नगर (1), द्वारका नगरी (1), पडेगाव (1), वेदांत नगर (1), जालन नगर (1), जय भवानी नगर (1), सातारा परिसर (1), घाटी परिसर (2), गजानन नगर (2), देवगिरी व्हॅली (1), नवयुग कॉलनी (1), पोदार शाळा (1), श्री गुजराती कन्या विद्यालय (1), बजरंग चौक परिसर (3), महेश नगर (1), बेगमपुरा (1), शारदा मंदिर (1), जागृती शाळा (1), क्रांती चौक परिसर (2), टिळक नगर (2), प्रतापगड नगर (1), नक्षत्रवाडी (2), अमर उच्च माध्यमिक विद्यालय, बायजीपुरा (1), कोमल नगर, पडेगाव (1), सईदा कॉलनी (1), मेहक नगर (1), स्टेपिंग स्टोन हायस्कूल (1), शिवतेज विद्या मंदिर (1), एन पाच सिडको (1), गारखेडा परिसर (1), नालंदा विद्यालय (1), केशवराज विद्यालय (1), बालाजी नगर (1), एन सात बळीराम चौक (1), अन्य (58)

ग्रामीण (12) कल्याण नगर, पाचोड (1), अन्य (11)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत गंगापूर तालुक्यातील बगडी येथील 78 वर्षीय पुरूष, शहरातील मुकुंदवाडीतील राम नगरातील 53 वर्षीय पुरूष आणि जिल्हा सामान्य रूग्णालयात 80 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.