नांदेड जिल्ह्यात 85 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू

नांदेड दि. 22 :- रविवार 22 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 85 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 50 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 35 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 25 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या एकुण 3 हजार 603 अहवालापैकी 3 हजार 467 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 06 एवढी झाली असून यातील 18 हजार 894 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 374 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 17 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. रविवार 22 नोव्हेंबर 2020 रोजी कंधार तालुक्यातील तिरकसवाडी येथील 76 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 544 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 7, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 10, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 1, लातूर येथे संदर्भीत 1 असे एकूण 25 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.45 टक्के आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 36 हजार 987निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 12 हजार 639एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 06एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 894एकूण मृत्यू संख्या- 544उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.45 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-23आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-28आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-972रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-374आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-17.