रेल्वेच्या विभागीय समितीवर डोईफोडे, उमाटे व वट्टमवार यांची नियुक्ती

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे युजर्स कन्सलटेटीव्ह कमेटीच्या सदस्यपदी नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या शिफारशीवरुन प्रजावणीचे संपादक शंतनू डोईफोडे, ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद उमाटे यांच्यासह लोहा येथील प्रसिध्द व्यापारी, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार यांची नेमणूक केली आहे.
नांदेड लोकसभा निवडणूकीत भरघोस यश मिळवल्यानंतर खा.चिखलीकर यांनी कार्यकर्त्यांना तसेच समाजात निष्ठेने काम करणार्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालु केले आहेत. त्यांनी कार्यकर्ते तसेच सामाजीक काम करणार्‍या व्यक्तींना संधी मिळावी या दृष्टीने विविध समित्यावर नियुक्ती करण्याचा सपाटा लावला असून विभागीय रेल्वे युजर्स कन्सलटेटीव्ह कमेटीच्या सदस्यपदी रेल्वे विषयक प्रश्‍नांची जाण असलेल्या नांदेड येथील प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, जेष्ठ पत्रकार प्रल्हाद उमाटे तसेच लोहा येथील प्रसिध्द व्यापारी, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार यांच्या नावाची शिफारस केली होती. खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या शिफारशी वरुन नांदेड दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी विभागीय रेल्वे युजर्स कन्सलटेटीव्ह कमेटीच्या सदस्यपदी प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, जेष्ठ पत्रकार प्रल्हाद उमाटे तसेच लोहा येथील प्रसिध्द व्यापारी माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार यांची नियुक्ती केली आहे. रेल्वेच्या विभागीय समितीवर जाणकार व्यक्तींची निवड केल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.