परभणी जिल्ह्यात 96 रुग्णांवर उपचार सुरू, 8 रुग्णांची वाढ

परभणी, दि. 20 :- जिल्ह्यातील 8 रुग्णांचे अहवाल गुरुवार दि.19 नोव्हेंबर 2020 रोजी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6943 एवढी झाली आहे. त्यापैकी 6566 बरे झाले तर 281 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 96 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :जिंतूर तालुक्यात कावी (1), पाथरी (1), परभणी तालुक्यात आसेगाव (1) व परभणी (1), पालम तालुक्यात रावराजूर (1), गंगाखेड तालुक्यात मरडसगाव (1), मानवत (2), तर गुरुवार दि.19 नोव्हेंबर रोजी एकुण 12 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सूट्टी देण्यात आली आहे. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.