औरंगाबाद जिल्ह्यात 138 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर ,चार मृत्यू

जिल्ह्यात 40161 कोरोनामुक्त, 629 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 18 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 87 जणांना (मनपा 72, ग्रामीण 15) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 40161 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 138 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 41914 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1124 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 629 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (116) जालान नगर (3), एन 7 सिडको (2), पेशवे नगर, सातारा परिसर (1), रचनाकार कॉलनी (8), गोविंद नगर आरटीओ रोड (1), गारखेडा व्यकटेश मंगल कार्यालय (1), आलोक नहर बीड बाय पास परिसर (1), गृह निर्माण योजना, शिवाजी नगर (1), गणेश नगर दिवाण देवडी (1), सराफा रोड(3), एन 3 सिडको (1), वेदांत नगर (1), शास्त्री नगर(1), मल्हार चौक परिसर (1), बालाजी नगर (1), बजाज नगर (1), बेगमपुरा(1), स्वप्न नगरी (1), नंदनवन कॉलनी(4), व्यंकटेश नगर (2), गारखेडा परिसर (1), बीड बायपास (4), म्हाडा कॉलनी (1), शुभश्री कॉलनी (1), पेठे नगर, भावसिंगपुरा (1), पडेगाव (4), मुलांचे वसतीगृह, घाटी (2), मार्ड हॉस्टेल (1), निराला बाजार (1), कांचनवाडी (1), बन्सीलाल नगर (1), नागेश्वरवाडी (1), बजाज नगर (1), दीप नगर, शहानूरवाडी (1), अन्य (59)

ग्रामीण (22) समता नगर, गंगापूर (1), अजंता फार्मा, पैठण एमआयडीसी (1), सिडको महानगर, तीसगाव (5), मोहटादेवी चौक् बजाजनगर, वडगाव (1), सावरकर कॉलनी, बजाजनगर, वडगाव सिडको (1), मुंडे चौक, जवळ,बजाजनगर ,वडगाव (1), न्यू भारत नगर, रांजणगाव (1), शिवाजी नगर, वडगाव (2), फुलेवाडी, वैजापूर (1), बाजाठाण फाटा , वैजापूर (1), न्यू हायस्कूल, गणोरी (4), कासोद, सिल्लोड (1), अन्य (2)

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत रांजणगाव शेणपुंजी येथील 62 वर्षीय स्त्री, सिद्धार्थ नगर येथील 32 वर्षीय पुरूष,सिद्धेश्वर नगर, जाधववाडीतील 48 वर्षीय पुरूष आणि खासगी रूग्णालयात मयूरबन कॉलनी, शहानूरमियाँ दर्गा जवळील 53 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.