नांदेड जिल्ह्यात 43 कोरोना बाधितांची भर तर दोघांचा मृत्यू

नांदेडदि. 18 :- बुधवार 18 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 20 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 43 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 14 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 29 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 269 अहवालापैकी 1 हजार 215 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 19 हजार 737 एवढी झाली असून यातील 18 हजार 739 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 264 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 20 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

मंगळवार 17 नोव्हेंबर 2020 रोजी किनवट येथील 65 वर्षाच्या एका महिलेचा खाजगी रुग्णालयात तर बुधवार 18 नोव्हेंबर 2020 रोजी बिलोली तालुक्यातील डोणगाव येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 543 झाली आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 30 हजार 252निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 6 हजार 920एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 737एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 739एकूण मृत्यू संख्या- 543उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.95 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-7आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-457रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-264आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-20.

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.