नांदेड जिल्ह्यात 32 कोरोना बाधितांची भर

नांदेड दि. 17 :- मंगळवार 17 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 18 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 32 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 19 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 13 बाधित आले.

आजच्या एकुण 419 अहवालापैकी 386 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 19 हजार 694 एवढी झाली असून यातील 18 हजार 719 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 243 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 18 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

आज रोजी प्राप्त अहवालानुसार एकाही रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला नाही. तर आज बरे झालेल्या बाधितांमध्ये खाजगी रुग्णालय 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 6, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, कंधार तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3 असे एकूण 18 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.04 टक्के आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 29 हजार 70निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 5 हजार 840एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 694एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 719एकूण मृत्यू संख्या- 541उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.04 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंकआज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-406रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-243आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले- 18.