औरंगाबाद जिल्ह्यात 65 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 39987 कोरोनामुक्त, 556 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 16 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 82 जणांना (मनपा 63, ग्रामीण 19) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 39987 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 65 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 41662 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1119 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 556 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (45) सिद्धार्थ गार्डन क्वार्टर परिसर (3), बन्सीलाल नगर (1), सातारा परिसर (3),मुकुंदवाडी (1), खोकडपुरा (1), एल ऍ़न्ड टी कंपनी परिसर (2), शंभू नगर (1), मिटमिटा (1), गादिया विहार (1), कामगार चौक (1), जय भवानी नगर (1), गुलमंडी (1), न्यू हनुमान नगर (1), कल्पतरू सो. (1), श्रेय नगर (3), एन सात (1), मयूर नगर (1), दिशा कृष्णा अपार्टमेंट (1), पद्मपुरा (1), देवानगरी (1), अन्य (18)

ग्रामीण (20) कुंभेफळ (3), सिल्लोड (1), करंजखेड, कन्नड (1), भोकरगाव, मनूर (3), वाहेगाव, गंगापूर (1), अन्य (11)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

शहरातील खासगी रूग्णालयात वैजापूर तालुक्यातील नाडी, पो. विरमगाव येथील 68 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.