संगीत देशाच्या सामूहिक ताकदीचा स्रोत बनले आहे : पंतप्रधान

नवी दिल्ली, 1 जून 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  स्पिक मॅके आंतरराष्ट्रीय संमेलनाला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले.

पंतप्रधानांनी या वस्तुस्थितीची  प्रशंसा करताना सांगितले कि इतक्या कठीण परिस्थितीत संगीतकारांची भावना बदललेली नाही आणि या संमेलनाची संकल्पना मुळी  कोविड -19 महामारीमुळे युवकांमध्ये निर्माण झालेला तणाव कसा कमी करता येईल यावर केंद्रित आहे. 

त्यांनी स्मरण करून दिले कि युद्ध आणि संकटाच्या काळात  ऐतिहासिक दृष्ट्या कशा प्रकारे संगीताने प्रेरित करण्यात आणि लोकांना एकमेकांशी जोडण्यात महत्वाची भूमिका पार पाडली होती.

ते म्हणले, कवी, गायक आणि कलाकारांनी नेहमी अशा वेळी लोकांमधील शौर्य बाहेर आणण्यासाठी गीत आणि संगीताची रचना केली.

पंतप्रधान म्हणाले कि आतादेखील अशा कठीण प्रसंगी जेव्हा जग एका अदृश्य शत्रूशी लढत आहे, गायक, गीतकार, आणि कलाकार ओळी रचून गाणी गात आहेत ज्यामुळे लोकांचा आत्मविश्वास वाढेल.

पंतप्रधानांनी स्मरण करून दिले की, कशा प्रकारे या देशाचे  130 कोटी लोक महामारीचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशात जोश भरण्यासाठी टाळ्या वाजवत, घंटानाद करत आणि शंख वाजवत एकत्र आले होते.

ते म्हणाले कि जेव्हा  समान भावना आणि विचाराने 130 कोटी लोक एकजुट होतात तेव्हा ते संगीत बनते.

ते म्हणाले कि ज्या प्रकारे संगीतात  सामंजस्य आणि शिस्त आवश्यक असते त्याचप्रमाणे कोरोना विरोधातील लढाईत प्रत्येक नागरिकाकडून सामंजस्य, संयम आणि शिस्त गरजेची आहे.

त्यांनी यावर्षी स्पिक मॅके संमेलनात  योग आणि नाद योग व्यतिरिक्त नेचर वॉक, हेरिटेज वॉक ,  साहित्य आणि सकस  भोजन (होलिस्टिक फूड) सारखे नवीन घटक समाविष्ट केल्याबद्दल प्रशंसा केली.

नाद योगचे वर्णन करताना ते म्हणाले कि भारतात नाद कडे संगीताचा पाया आणि आत्मउर्जाचा आधार म्हणून पाहिले जाते.

ते म्हणाले कि जेव्हा आपण योग आणि संगीताच्या माध्यमातून आपली आंतरिक ऊर्जा नियंत्रित करतो तेव्हा हा नाद आपल्या  स्वरोत्कर्ष किंवा ब्रह्मनाद स्थितित पोहचतो.

पंतप्रधान म्हणाले कि हेच कारण आहे  कि संगीत आणि  योग या दोन्हीमध्ये ध्यान आणि  प्रेरणा देण्याची शक्ती आहे , दोन्ही ऊर्जेचे मोठे स्रोत आहेत.

संगीत केवळ आनंदाचा स्रोत नाही तर ते सेवेचे एक माध्यम आणि तपश्चर्येचे एक रूप आहे.

ते म्हणाले  कि आपल्या देशात अनेक महान संगीतकार होऊन गेले , ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मानवतेच्या सेवेसाठी व्यतीत केले.

पंतप्रधान म्हणाले की, तंत्रज्ञानासह प्राचीन कला आणि संगीत याचा मिलाफ ही काळाची गरज आहे. राज्य आणि भाषांच्या सीमांपलिकडे आज संगीत ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ चे आदर्श देखील  मजबूत करत आहे जे यापूर्वी कधी झाले नाही.

लोक आपल्या रचनात्मकतेच्या माध्यमातून सोशल मीडियावर नवीन संदेश देत आहेत, त्याचबरोबर कोरोना विरुद्ध देशाचे अभियान पुढे नेट आहेत याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.

पंतप्रधानांनी आशा व्यक्त केली कि हे संमेलन  कोरोना विषाणू विरुद्ध आपल्या लढाईला नवी दिशा देखील देईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *