भारतात गेल्या 8 दिवसांपासून दररोज 50 हजारापेक्षा कमी रुग्णांची नोंद

नवी दिल्‍ली, 15 नोव्‍हेंबर 2020

भारतभरात सतत 8 व्या दिवशी 50,000हून कमी कोविड-19 च्या नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत फक्त 41,000 रूग्ण कोविडने बाधित झाल्याचे आढळून आले आहे. 7 नोव्हेंबर पर्यंत, रोजची नवी रूग्ण संख्या 50 हजारांच्या उंबरठ्यावर होती. विविध लोकसंख्येच्या समुदायाने कोविड उचित वर्तणूक यशस्वीपणे अंगिकारल्याने हे शक्य झाले आहे, कारण युरोप आणि अमेरीकेतील अनेक देशातील रुग्णांची संख्या दररोज वाढल्याचा कल दिसून येत आहे.

गेल्या 24 तासांत भारतात देखील 42,156 रूग्ण नव्याने बरे झाल्याची नोंद झाली असून त्यामुळे सक्रीय रूग्णांचा भार कमी झाला आहे. भारतात सक्रीय रूग्णभार 4,79,216 इतका असून तो पॉझिटिव्ह रूग्णांच्या केवळ 5.44% इतका आहे.

15 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात दर दहा लाखामागे भारतात सर्वात कमी रूग्ण आहेत (6,387).

नव्याने बरे होणाऱ्या रूग्णांच्या  प्रत्येक 24 तासांतील दरात सुधारणा झाली असून बरे होण्याचा दर आज 93.09% इतका राहिला आहे.बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 82,05,728 इतकी आहे. बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय रूग्ण यातील फरक सतत वाढत असून तो आता 77,26,512 इतका  झाला  आहे.

नव्यानं बरे झालेल्या रुग्णांपैकी 79.91%रुग्णांचा वाटा  दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील रूग्णांचा  आहे.

दिल्लीत सर्वाधिक रुग्ण कोविड मधून मुक्त  झाले असून त्यांची संख्या 7,117 इतकी आहे. केरळमध्ये 6,793 रूग्ण दररोज बरे होत आहेत तर पश्चिम बंगाल येथे 4,479 रूग्ण नव्याने बरे झाल्याची नोंद झाली आहे.

दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशात 82.87% नवे रूग्ण आढळून आले आहेत.

दिल्लीत गेल्या 24 तासांत 7,340 रूग्णांची नोंद झाली आहे. केरळमध्ये 6,357नव्या रूग्णांची तर महाराष्ट्रात 4,327 रूग्णांची काल नोंद झाली.

गेल्या 24 तासांत 447 रूग्ण मृत्युमुखी पडले असून त्यापैकी 85.01% हे दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

नव्याने मृत्युमुखी पडलेल्या रूग्णांपैकी 23.5% रूग्ण महाराष्ट्रातील असून 105 मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यानंतर दिल्लीत 96 तर पश्चिम बंगाल मधे 53 रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत.