औंरगाबाद जिल्ह्यात आज 55 रुग्णांची वाढ

जिल्ह्यात 514 रुग्णांवर उपचार सुरू

औंरगाबाद, दि.02 : औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 55 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1642 झाली आहे. यापैकी 1049 कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 79 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 514 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. शहा बाजार (1), किराडपुरा (2), चंपा चौक (1), कटकट गेट (1), नारळीबाग (1), गणेश कॉलनी (1), जवाहर नगर (3), भीम नगर (2), हमालवाडी (1), शिवशंकर कॉलनी (2), नाथ नगर (2), ज्योती नगर (1), फजलपुरा परिसर (1), मिल कॉर्नर (1), एन-3 सिडको (1), एमजीएम परिसर (1), रोशन गेट (1) , विशाल नगर, गारखेडा परिसर (1), एन-सहा संभाजी कॉलनी (7), समता नगर (5), अंहिसा नगर (1), मुकुंदवाडी (1), विद्या निकेतन कॉलनी (1), न्याय नगर (1), बायजीपुरा (2), संजय नगर, मुकुंदवाडी (4), विजय नगर (2), यशवंत नगर, पैठण (1), चंपा चौक, म्हाडा कॉलनी (1), नेहरु नगर (1), जुना मोंढा नाका परिसर (1), अन्य (3) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 24 महिला आणि 31 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये खिवंसरा पार्क, गारखेडा परिसरातील कोरोनबाधित असलेल्या 64 वर्षीय पुरूष रुग्णाचा 1 जून रोजी रात्री 11.30 वा. उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 63, तीन खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 15, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 79 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *