भारतातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी होत 4.8 लाख

रूग्ण बरे होण्याचा दर 93% पेक्षा अधिक

नवी दिल्ली ,  14 नोव्हेंबर 2020

सतत चौथ्या दिवशी 5 लाखांपेक्षा कमी रुग्ण संख्या नोंदवत आजच्या तारखेपर्यंत  भारतातील सक्रीय रुग्णांची संख्या 4,80,719  इतकी  कमी झाली आहे. पॉझिटीव्ह रूग्ण आणि सक्रीय रुग्ण यांचे प्रमाण कमी होऊन ते आता 5.48% इतके झाले आहे.

नव्या रुग्णांपेक्षा नव्या बरे झालेल्या रूग्णांचे प्रमाण दररोज वाढत असून आज 44,684 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर गेल्या 24 तासांत 47,992 रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे.नव्या रूग्णसंख्येचा आलेख खाली येत असून लोकसंख्या कोविड अनुरुप वर्तणूक आत्मसात करत असल्याचे दर्शवित आहे आणि केंद्र सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करीत राज्ये/केंद्रशासित प्रदेश प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करत असल्याचे दर्शवित आहे. गेले 5 आठवडे  नवीन रूग्णांची सरासरी संख्या कमी होत असल्याचे दाखवत आहे.त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 93%पर्यंत वर आला आहे. एकूण राष्ट्रीय दर 93.05% इतका आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 81,63,572 इतकी आहे.बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय रुग्ण यांच्यातील अंतर  हळूहळू वाढत असून आता ते 76,82,853 इतके झाले आहे.

बरे झालेल्या रूग्णांपैकी 75.38% रूग्ण 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील आहेत. गेल्या 24 तासांत दिल्लीत सर्वाधिक रूग्ण बरे झाले असून, रुग्णांची संख्या 6,498 इतकी आहे. केरळमध्ये 6,201 रुग्ण  दररोज बरे होत असून महाराष्ट्रात 4,543 रुग्ण बरे झाले आहेत.

10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात 76.38%नवे रुग्ण आढळले आहेत.दिल्लीत गेल्या 24 तासांत रूग्णसंख्या वाढून त्यात 7,802 अधिक रुग्णांची भर पडली आहे. केरळमध्ये नव्या 5,804 रूग्णांची नोंद झाली आहे तर महाराष्ट्रात काल  4,132 रुग्णांची नोंद होऊन तो तिसऱ्या स्थानावर आहे.गेल्या 24 तासांत 520  रुग्ण मृत्यूमुखी पडले असल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी 79.23%रुग्ण दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशात आहेत. महाराष्ट्रात 127 मृत्यूंची नोंद होऊन एकूण नव्या रूग्णांचा मृत्यूमुखी पडण्याचा दर 24.4%  इतका आहे. त्यानंतर दिल्लीत 91 तर पश्चिम बंगाल येथे 51 रूग्ण मरण पावले आहेत