Skip to content
Thursday, August 18, 2022
Latest:
  • दहिहंडीच्या प्रो-गोविंदा स्पर्धांना मान्यता; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
  • पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रादुर्भावासंदर्भात आरोग्यमंत्र्यांकडे परिपूर्ण माहिती नसल्याने प्रश्न राखून ठेवण्याची सरकारवर नामुष्की
  • शिंदे सरकारचा १५ सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार – बच्चू कडू
  • रायगडमधील संशयास्पद बोट प्रकरणी हाय अलर्ट – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत माहिती
  • महाराष्ट्रात पुन्हा घातपात?श्रीवर्धन समुद्र किनारी दोन बोट आणि शस्त्रसाठा सापडला
aajdinank logo

आज दिनांक

अपडेट झटपट

  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम
  • दिनांक स्पेशल
  • मनोरंजन
  • देश विदेश
  • व्यापार
  • Contact
औरंगाबाद औरंगाबाद खंडपीठ  पाणीपुरवठा  मराठवाडा  

थत्ते हौदाला  संरक्षित स्मारक घोषित करण्याचा पुनर्विचार  करावा

November 14, 2020November 14, 2020 Aaj Dinank Team Aurangabad bench of the Bombay High Court, constructed in 1762 AD in Begumpura, HC quashes ASI decision to un-protect Thatte Nahar, independent water supply system like the aqueducts of ancient Rome, Thatte Nahar is a source of drinking water to 10000 residents of the Begumpura locality, The Thatte Nahar
औरंगाबाद खंडपीठाचे पुरातत्व विभागाला आदेश 

औरंगाबाद
थत्ते हौदाला  संरक्षित स्मारक  म्हणून घोषित करण्याबाबत केंद्र शासन आणि पुरातत्व  खात्याने  पुनर्विचार  करावा ,असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.संजय गंगापूरवाला व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी दिले आहेत .

या संदर्भात अनंत विनायक थत्ते यांनी याचिका दाखल केली होती.  याचिकाकर्त्यांच्या पूर्वजांनी ४०० वर्षांपूर्वी साडेपाच किलोमीटर अंतराची नहर आणि थत्ते हौद बांधला.  या नहरीचे पाणी सातत्याने सुरु राहिले. अगदी १९७२ च्या दुष्काळातही येथे पाणी होते आणि ते बेगमपुरा आणि परिसरातील नागरिक वापरीत. १९७१ मध्ये पुरातत्व विभागाने थत्ते कुटुंबियांशी एक करार केला. त्यानुसार थत्ते हौद आणि नहर यांची मालकी आणि दुरुस्ती व देखभाल पुरातत्व खात्याकडे आली. मात्र याचे नाव थत्ते हौद असे कायम ठेवण्यात आले.त्यानंतर या नहरीच्या दोनशे मीटर परिसरात नहरीला नुकसान पोहोचेल असे कोणतेही काम करण्यास मनाई करण्यात आली.

इस्लामपूरवाडीत कोरड्या दगडी बांधकामात विहिरीपासून तयार झालेल्या, नाणारमधील पाणी विटाच्या चुनखडीत बांधलेल्या भूमिगत कमानी बोगद्यामधून वाहते आणि त्यानंतर श्री स्थित एका मोठ्या तलावामध्ये टेराकोटा पाईप लाईनद्वारे शिंपले जाते. भगवानराव थत्ते-नाईक यांचे निवासस्थान. थत्तेचे घर स्वतः टाकीच्या मध्यभागी असलेल्या कारंजेसह पर्शियन शैलीच्या आर्किटेक्चरचा अभिमान बाळगते. हायड्रॉलिक अभियांत्रिकीचा ऐतिहासिक चमत्कार आणि मध्ययुगीन पाण्याची पाइपलाइन प्रणालींपैकी एक प्राचीन पाणीपुरवठा. थत्ते नहर हे बेगमपुरा परिसरातील १० हजार  रहिवासी, एएसआय सर्कल कार्यालये, कर्मचारी वर्ग आणि २५ एकरांना पाणीपुरवठा करतात.

पुरातत्व विभागातर्फे याची सातत्याने दुरुस्ती आणि देखभालही केली जाते.२००९ मध्ये पुरातत्व विभागाने एक प्राथमिक अधिसूचना काढून थत्ते नहर आणि हौद सांस्कृतिक वारस घोषित करीत त्यावर आक्षेप मागविले. मात्र अजूनपर्यंत अंतिम अधिसूचना काढलीच नाही. अशाच प्रकारे बीबी का मकबरा आणि घृष्णेश्वर मंदिर यांबाबतही अंतिम अधिसूचना काढलेली नाही. दरम्यानच्या काळात राजकीय हस्तक्षेपाने या परिसरात धोकादायक पद्धतीने बांधकामे करण्यात आली. याचिकेच्या सुनावणीवेळी पुरातत्व विभागातर्फे दाखल करण्यात आलेल्या उत्तरात, हा परिसर खूप गर्दीचा असल्याने येथे बांधकामांना प्रतिबंध करणे शक्य होत नसल्याचे तसेच नहर आणि हौदाची दाखभाल व दुरुस्ती करत असल्याचे सांगितले. मात्र २०१५ ते १८ दरम्यान पाणीच नसल्याने नहरमध्ये अनेक ठिकाणी गाळाने ब्लॉकेज तसेच गळतीही निर्माण झाल्याचे सांगितले.  यावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुरातत्व विभाग आणि महापालिकेने नहरीचा सर्व्हे केला..यातही जागोजागी ब्लॉकेज आणि गळती आढळल्याचा अहवाल सादर करीत याच्या दुरुस्तीचा खर्च कुणी करायचा हे निश्चित होत नसल्याने काम थांबल्याचे सांगण्यात आले. यावर खंडपीठाने महापालिका आणि पुरातत्व खाते यांनी एकत्रितपणे जबाबदारी घेऊन येत्या पावसाळ्यापूर्वी ब्लॉकेज आणि गळती दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले . या प्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फे सतीश तळेकर आणि  प्रज्ञा तळेकर यांनी काम पाहिले.———-

  • ← एसईबीसी वगळून अन्य प्रवर्गाच्या तलाठी यांना नियुक्त्या देण्याचे आदेश
  • औरंगाबाद जिल्ह्यात 70 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर →

You May Also Like

औरंगाबादकरांनो सावधान …२४ तासांत ४३ कोरोनाबाधितांचा मृत्यू

March 31, 2021March 31, 2021 Aaj Dinank Team

मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अवमानकारक विधान समाजकंटकाविरुद्ध कारवाई करा-वैजापूर मुस्लिम समाज

November 12, 2021November 12, 2021 Aaj Dinank Team

औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणूक ,1 डिसेंबरला मतदान

November 2, 2020November 2, 2020 Aaj Dinank Team

ताज्या बातम्या

दहिहंडीच्या प्रो-गोविंदा स्पर्धांना मान्यता; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई  विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन 

दहिहंडीच्या प्रो-गोविंदा स्पर्धांना मान्यता; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

August 18, 2022August 18, 2022 Aaj Dinank Team

मुंबई,१८ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- महाराष्ट्राची  सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेल्या दहिहंडीच्या (गोविंदा) “प्रो गोविंदा” स्पर्धा घेण्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत

पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रादुर्भावासंदर्भात आरोग्यमंत्र्यांकडे परिपूर्ण माहिती नसल्याने प्रश्न राखून ठेवण्याची सरकारवर नामुष्की
मुंबई  विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन 

पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रादुर्भावासंदर्भात आरोग्यमंत्र्यांकडे परिपूर्ण माहिती नसल्याने प्रश्न राखून ठेवण्याची सरकारवर नामुष्की

August 18, 2022August 18, 2022 Aaj Dinank Team
शिंदे सरकारचा १५ सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार – बच्चू कडू
महिला राजकारण 

शिंदे सरकारचा १५ सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार – बच्चू कडू

August 18, 2022August 18, 2022 Aaj Dinank Team
महाराष्ट्र 

रायगडमधील संशयास्पद बोट प्रकरणी हाय अलर्ट – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत माहिती

August 18, 2022August 18, 2022 Aaj Dinank Team
महाराष्ट्रात पुन्हा घातपात?श्रीवर्धन समुद्र किनारी दोन बोट आणि शस्त्रसाठा सापडला
कोकण  महाराष्ट्र मुंबई  

महाराष्ट्रात पुन्हा घातपात?श्रीवर्धन समुद्र किनारी दोन बोट आणि शस्त्रसाठा सापडला

August 18, 2022August 18, 2022 Aaj Dinank Team

About Us

www.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.

कॅलेंडर

August 2022
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Jul    

संपर्क

ईमेल: [email protected]

[email protected]

मोबाईल नंबर -८४८४०३०७८१

पत्ता :
आज दिनांक मीडिया सर्व्हिसेस

शॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१

 

Copyright © 2020.AajDinank Powered by Ashvamedh Software.