जालना जिल्ह्यात 37 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

11 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज — जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि. 14 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 11 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआरद्वारे 36 तर अँटीजेन तपासणीद्वारे 1 असे एकुण 37 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-17608 असुन सध्या रुग्णालयात-166 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6078 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-753 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-79639 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -37असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-11619 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-65900रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने- 1793, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5143

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-14, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-5621 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -5, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 28 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-13, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-166, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 14, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-11, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-10804, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-513 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-167319 मृतांची संख्या-302